फिटनेस प्रेमी बॉलीवूड स्टार्स (Bollywood Actors...

फिटनेस प्रेमी बॉलीवूड स्टार्स (Bollywood Actors Who Are Fitness Freak)

फिट है तो हिट है ही संज्ञा बॉलिवूडच्या कलाकारांना तंतोतंत जुळते. बॉलिवूड कलाकारांचा डान्स, त्यांची फिगर, आकर्षक व्यक्तिमत्त्व ही त्यांच्या कामाची आवश्यक गरज असते. त्यासाठी हे कलाकार अतिशय मेहनत घेताना दिसतात. काही वेळेस चित्रपटातील एखाद्या भूमिकेची गरज म्हणून ते आपल्यामध्ये अविश्वसनीय बदल घडवून आणतात. हे फिटनेसप्रेमी कलाकार त्यांच्या चाहत्यांचे आदर्श असतात. हे कलाकार कोण आहेत ते पाहूया.

हृतिक रोशन
बॉलिवूडमधील सर्वाधिक मागणी असलेला अभिनेता हृतिक रोशन हा स्वतःच्या फिटनेसबाबत अतिशय शिस्तबद्ध आहे. तो नेहमी वर्कआऊट करतो. चित्रपटांच्या शुटिंग्सच्या ठिकाणीही तो आपला नियम न मोडता वर्कआऊट करतो. हृतिकने घरीच जिम बनवली आहे, जेथे फिटनेसची सर्व साधने उपलब्ध आहेत.

दिशा पटानी
अभिनेत्री दिशा पटानीचा हॉट आणि स्टायलिश अंदाज पाहून ती आपल्या फिटनेससाठी किती मेहनत घेत असेल यांचा अंदाज येतो. ही तरुण आणि हुशार अभिनेत्री आपल्या सेक्सी शरीरयष्ठीसाठीच विशेष लोकप्रिय आहे.

सलमान खान
दबंग सलमान खानचा शर्ट लेस लुक आणि कमालीचं शरीरसौष्ठव पाहून थिएटरमध्ये त्याच्या एन्ट्रीला चाहत्यांच्या शिट्ट्या पडतात. सलमानचे चाहते त्याच्यासारखी बॉडी बनविण्याची स्वप्ने पाहतात. रोज १००० पुश अप्स, २००० सिट अप्स शिवाय दोन तासांचे नियमित वर्कआऊट आणि सायकलिंग हे सलमानाच्या फिटनेसचे रहस्य आहे.

आमिर खान
बॉलीवुडचा मि. परफेक्टशनिस्ट आमिर खान आपल्या चित्रपटातील भूमिकेसाठी जेवढी मेहनत घेतो तेवढीच मेहनत तो स्वतःच्या आरोग्याविषयीही घेताना दिसतो. त्यासाठी तो नियमित तीन तास वर्कआऊट करतो. फिटनेस राखण्यासाठी रात्री ८ नंतर तो शुगर आणि कार्ब्स असलेले पदार्थ खात नाही.

शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टीचा सडसडीत बांधा आणि हॉटनेसमुळे चाहत्यांच्या दृष्टित ती फिटनेस क्वीन आहे. शिल्पाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की, तिचं वय वाढतंय तसं तिचं सौंदर्य आणि फिटनेस अधिक प्रभावी होत आहे. याचं कारण शिल्पा आपला फिटनेस आणि सौंदर्य कायम राखण्यासाठी नियमितपणे योग आणि व्यायाम करते. सोबतच तिचं तिच्या आहारावरही नियंत्रण आहे.

शाहिद कपूर
शाहिदने देखील आपल्या बॉडीमध्ये कमालीचा बदल घडवून आणला आहे. नृत्य, अभिनय याबरोबरच आता तो आपल्या बॉडीसाठीही लोकप्रिय ठरत आहे. आठवड्यातील ६ दिवस तो वर्कआऊट करतो. यात तो कार्डिओ आणि वेट ट्रेनिंगवर जास्त लक्ष केंद्रित करतो. सोबतच तो शाकाहारी आहार फॉलो करतो.

मलाइका अरोरा
मलाइका अरोरा बॉलीवुडची सर्वाधिक फिट आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. जिम, पिलाटे आणि योग स्टूडियोबाहेर स्टायलिश अंदाजात ती आपले फोटो शेअर करत असते. फिटनेस आणि फिगरसाठीची तिची जी आवड आहे, ती केवळ तिच्या चाहत्यांनाच नव्हे तर चित्रसृष्टीतील इतर अभिनेत्रींनाही भुरळ पाडणारी आहे. मलायका आपले फिटनेस रुटीन कधीही मिस करत नाही.