अंनत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुड्याला ...

अंनत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुड्याला बॉलिवूड कलाकारांची ग्लॅमरस अंदाजात हजेरी(Bollywood Actor’s Glamorous Gathering At Anant Ambani-Radhika Merchant Engagement Ceremony)

सध्या संपूर्ण कपूर अंबानी कुटुंबात आनंदी वातावरण असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच अंबानी कुटुंबाची लाडकी कन्या इशा अंबानी आपल्या नवजात जुळ्या मुलांना घेऊन भारतात परतली. त्यानंतर काही दिवसांनीच मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा पार पडला. अनंत अंबानीने आपली मैत्रीण राधिका मर्चंटसोबत साखरपुडा केला आहे.

अनंत अंबानीच्या साखरपुड्यासाठी संपूर्ण अंबानी आणि मर्चंट परिवार राजस्थानला रवाना झाले होते. तिथे श्रीनाथजी मंदिरात अंनत आणि राधिकाचा रोका सोहळा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनंत आणि राधिकाचे लग्न कधी होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

साखरपुड्यानंतर मुकेश आणि नीता यांनी त्यांचा मुलगा आणि भावी सुनेचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील त्यांच्या घरी अँटिलिया येथे एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. अनेक बॉलिवूड स्टार्संनी या पार्टीला हजेरी लावली. शाहरुख खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, सलमान खान, रणवीर सिंग यांसारख्या सेलिब्रिटींनी पार्टीला उपस्थिती लावली.

अभिनेता रणवीर सिंहने पार्टीला उपस्थिती लावली होती.तेव्हा त्याने काळ्या रंगाचा टर्टलनेक टी-शर्ट आणि त्याला जुळणारी पॅन्ट घातली होती. नेकलेस, काळी टोपी आणि रंगीत चष्म्या या इतर गोष्टीने त्याने आपला लूक पूर्ण केला होता.

अभिनेत्री जान्हवी कपूरने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्यावर तिने गोलनेकलाइन असलेला ब्लाऊज घातला होता.

 एंगेजमेंट पार्टीत क्रिकेटर झहीर खान पत्नी आणि अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत गेला होता. अभिनेत्रीने लांब कुर्ता घातला होता. तर झहिरने निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता.