गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आ...

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आलेले बॉलिवूड कलाकार व चित्रपट; रणबीर कपूरच्या कुटुंबाचाही असा आगळावेगळा रेकॉर्ड (Bollywood actors and films recorded in the Guinness Book of World Records; Such a unique record of Ranbir Kapoor’s family)

आशा भोसले यांनी २०११ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रचला होता.

१९४७ पासून २० भारतीय भाषांमध्ये ११,००० हून अधिक गाणी गाण्यासाठी आशा भोसले यांना गिनीज बुक तर्फे सन्मानित करण्यात आले होते.

एस. राजामौली यांचा बाहुबली द बिगिनिंग हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता, चित्रपटाचे यश पाहून कोचीच्या ग्लोबल युनायटेड मीडिया कंपनीने चित्रपटाचे 50,000 चौरस फिट पोस्टर बनवले, यासाठीच त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

जब से तेरे नैना (सावरिया), तुम पास आये (कुछ कुछ होता है), नजर के सामने (आशिकी) अशी सुपरहिट गाणी लिहिणाऱ्या समीर अंजान यांनी १५ डिसेंबर २०१५ पर्यंत ३,५२४ गाणी रचून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

ह्रितिक रोशन चा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाला स्टार स्क्रीन अवॉर्ड, झी सिने अवॉर्ड, आयफा अवॉर्ड आणि चॅनल व्ही यासह फिल्मफेअरसह एकूण 92 पुरस्कार मिळाले.

सर्वाधिक पुरस्कार प्राप्त केलेल्या या चित्रपटाने २००२ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रचला होता.

90 च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध गायकांपैकी एक असलेल्या कुमार सानू यांना १९९३ मध्ये एकाच दिवशी २८ गाणी रेकॉर्ड करून गिनीज बुकमध्ये आपले नाव नोंदवले होते.

कपूर कुटुंबाच्या नावे सुद्धा एक खास गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. १९२९ मध्ये पृथ्वीराज कपूर यांच्यापासून राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर ते आता नव्या पिढीतील रणबीर कपूर आणि करीना कपूर यांच्यासह तब्बल २४ जणांनी रुपेरी पडद्यावर काम केले आहे.

चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठे कुटुंब म्हणून १९९९ साली कपूर कुटुंबाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली होती

ललिता पवार यांनी वयाच्या १२ व्या वर्षीपासून ७० वर्षे चित्रपटांमध्ये काम केले. यादरम्यान त्यांनी सुमारे ७०० चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेत्री म्हणून सर्वाधिक प्रदीर्घ चित्रपट कारकिर्द करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ललिता पवार यांच्या नावे आहे.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 792 कोटींची कमाई केली भारताबाहेरील इतर देशात सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता. यासाठी PK चित्रपटाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

अभिनेता जगदीश राज यांनी १४४ चित्रपटांमध्ये पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. याची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली आहे.

१९३६ मध्ये जीवन नैया या चित्रपटातून पदार्पण केल्यापासून अशोक कुमार यांनी ६३ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलीवूडमधील सर्वात प्रदीर्घ कारकिर्दीत प्रमुख भूमिका साकारण्यासाठी त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली होती.

(सर्व फोटो: संग्रहित/संपादित)