सारा अली खानचे गरमागरम, उन्मादक फोटो (Bold And ...

सारा अली खानचे गरमागरम, उन्मादक फोटो (Bold And Sexy Photos Of Sara Ali Khan)

सारा अली खान पारंपरिक पोशाखात असो वा बिकिनी किंवा स्विमिंग सूटमध्ये ती सुंदर आणि आकर्षकच दिसते. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मैत्रिणींसोबतचे समुद्रकिनारी मजा करतानाचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. समुद्राच्या सुंदर लाटांचा व्हिडिओ देखील अप्रतिम आहे.

साराची मौजमजा करण्याची पद्धतही एकदम फिल्मी असते. ती तिच्या मैत्रिणींची टीम बनवते अन्‌ जगभर हिंडत फिरते. कधी ती तीर्थक्षेत्री जाते, तर कधी मंदिरात जाते, कधी ती दर्ग्यातही प्रार्थना करताना दिसते. काहीवेळा ती गुरुद्वारात डोके टेकवताना दिसते.

या सगळ्यांसोबतच तिला निसर्गरम्य ठिकाणी फिरायला, निसर्गाचा आनंद लुटायला, पर्वत आणि मैदाने बघायला देखील आवडतात. पाणी तर तिला फार आवडते.

ती अनेकदा तिच्या मैत्रिणींसोबत समुद्रात स्विमिंग सूट वा हॉट बिकिनीमध्ये एन्जॉय करताना दिसते. ती तिचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करते.

आजही तिने तिच्या मैत्रिणींसोबत हॉट बिकिनीसह वेगवेगळ्या सुंदर स्टाइलमध्ये फोटो शेअर केले आहेत. समंदर में नहाकर और भी नमकीन लग रही हो… हे गाणंही त्यांनी खूप एन्जॉय केलं. साराचे हे उन्मादक फोटो, तिची मस्ती, खोडकरपणा या सगळ्या गोष्टी तिच्या चाहत्यांना खूप आकर्षित करतात.

तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी जोरदार कमेंट केल्या आहेत. काहींनी तिला हॉट म्हटले तर काहींनी तिला सेक्सी आणि सुंदर म्हटले. कुणी म्हटलं की आज कुणाला झोप येणार नाही.. असंही कुणीतरी म्हटलं होतं की मला सारा आवडते. तर काहींनी तिच्या अशा कपडे घालण्यावर कडकडून टीकाही केली आहे. पण प्रत्येकाला स्वतःचं वैयक्तिक आयुष्य त्यांच्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे आणि साराही तेच करत आहे.

काही दिवसांपूर्वी ती तिची को-स्टार जान्हवी कपूरसोबत केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यानंतर तिथून तिने केदारनाथचे मंदिर, दऱ्या, पर्वत, नजारे यांचे सुंदर फोटो शेअर केले होते. तिची ती पोस्टही चांगलीच व्हायरल झाली होती.

साराच्या कामाबाबत सांगायचं तर, अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुषसोबत तिचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट येणार आहे, यातही ती काही अतरंगीपणा करताना दिसेल, यात शंका नाही…

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम