अमृतवृक्ष कडुनिंब (Bitter-Lemon Tree Has Quali...

अमृतवृक्ष कडुनिंब (Bitter-Lemon Tree Has Qualities Of Nectar)

Woman with problematic hair

चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा तडाखा जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढू लागते आणि त्यामुळे नानाविध आजार बळावू लागतात. या आजारांचं प्रमाण कमी व्हावं आणि आपली रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहावी, जेणेकरून येणारं वर्ष आरोग्यदायी असावं, याच विचारातून बहुधा आपल्या पूर्वजांनी गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाला महत्त्वपूर्ण स्थान दिलं आहे.
चैत्र मासातील पहिली तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा ही वर्षप्रतिपदा मानली जाते. ‘प्रतिपदा’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषेत ‘पाडवा’ हा शब्द रूढ झाला. वसंत ऋतूचं आगमन आणि नववर्षाचा प्रारंभ म्हणून ‘चैत्रपाडवा’ साजरा होतो. या दिवशी गुढ्या-तोरणं उभारण्याची परंपरा रुजल्यामुळे या सणाला ‘गुढीपाडवा’ असं संबोधलं जातं. चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा तडाखा जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढू लागते आणि त्यामुळे नानाविध आजार बळावू लागतात. या आजारांचं प्रमाण कमी व्हावं आणि आपली रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहावी, जेणेकरून येणारं वर्ष आरोग्यदायी असावं, याच विचारातून बहुधा आपल्या पूर्वजांनी गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाला महत्त्वपूर्ण स्थान दिलं आहे.
आजारांवर उपकारक
गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची डहाळी घालून त्या पाण्याने स्नान करण्याची प्रथा आहे. तसंच गुढीलाही कडुनिंबाची डहाळी लावून त्याची पूजा करतात. शिवाय गुढीपाडव्याला पहाटे कडुनिंबाच्या कोवळ्या पानांसोबत जिरं, मिरी, हिंग, सैंधव, गूळ आणि ओवा बारीक वाटून घेतात आणि पहाटे घरातील सर्व हे मिश्रण थोड्या थोड्या प्रमाणात खातात. पूर्वापार चालत आलेली ही प्रथा.

Woman with problematic hair

चैत्र मासापासून उन्हाळ्याचे दिवस सुरू होतात. वातावरणात उष्णता वाढू लागते. यामुळे आरोग्यावर होणार्‍या बहुतांश विपरीत परिणामांपासून कडुनिंबाचं हे मिश्रण आपला बचाव करतं. उष्णतेच्या विकारांवर कडुनिंब उपयुक्त आहेच. सोबत भूक न लागणं, वांती, आम्लपित्त, कावीळ, मूळव्याध, पोटदुखी, जंत, त्वचा रोग, जखम, दाह रोग, अकाली केस पांढरे होणं, ताप, मुख रोग, दाताचे विकार, नेत्र दोष, स्त्रियांचे आजार, सांधेदुखी इत्यादी आजारांवरही ते लाभदायक आहे. जंतुनाशक म्हणूनही कडुनिंब उपयुक्त आहे. विविध आजारांवर उपयुक्त अशा या कडुनिंबाची कीर्ती विदेशापर्यंत पोहोचली आहे. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स अकादमीने ‘नीम : अ ट्री फॉर सॉल्व्हिंग ग्लोबल प्रॉब्लेम्स’ या नावाचा अहवालच प्रसिद्ध केला आहे. मात्र कडुनिंबाचं अतिसेवन आरोग्यास अपायकारक ठरतं, म्हणूनच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच कडुनिंबाचा उपयोग करणं योग्य ठरतं.