बर्थडे स्पेशल : अक्षयकुमारने प्रेमात धोका दिल्य...

बर्थडे स्पेशल : अक्षयकुमारने प्रेमात धोका दिल्यावर शिल्पा शेट्टीने केले होते आक्रंदन : म्हणाली होती, ‘त्याने माझा वापर केला आणि…’ ‘(Birthday Special: When Heart Broken Shilpa Shetty Claimed, Akshay Kumar used and dropped her)

शिल्पा शेट्टी आज आपला ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा शेलाटा बांधा आणि राखलेले आरोग्य पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधता येत नाही. शिल्पा सोशल मीडियावर फारच सक्रीय आहे. अन्‌ त्यावर आपल्या खासगी आणि व्यावसायिक घडामोडींना प्रसिद्धी देत असते. पण आज तिच्या वाढदिवशी आपण तिच्या पहिल्याच प्रेमप्रकरणाचा आढावा घेऊया. त्यात तिला धोका दिला गेला होता व तिने खूपच आक्रंदन केले होते.

आज शिल्पा भलेही राज कुंद्रा या उद्योगपतीशी लग्न करून सुखी संसारात रमली असली तरी हा गृहस्थ तिच्या आयुष्यात येण्यापूर्वी तिचा प्रेमभंग झाला होता. अन्‌ हा धक्का तिला अक्षयकुमारने दिला होता. या दोघांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली व तिचा अंत कसा झाला, ते पाहूया.

शिल्पा आणि अक्षय जेव्हा विलग झाले, तेव्हा शिल्पाला खूप दुःख झालं, व रडत रडत तिनं आपल्याला कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं, ते सांगितलं होतं. अक्षयने दोनदा आपला वापर केला आणि मग सोडून दिलं, असं शिल्पाने सांगितलं होतं.

‘मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटात शिल्पा-अक्षय काम करत होते, तेव्हा या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली होती. खरं तर, अक्षय तेव्हा रविना टंडनशी डेट करत होता. अक्षयने रविनाशी मंदिरात जाऊन गुपचूप सगाई केली होती, असंही तेव्हा सांगितलं जात होतं. पण त्याचं मन शिल्पाकडे आकर्षित झालं आणि त्यानं रविनाला डच्चू दिला.

शिल्पा-अक्षयच्या प्रेमकथा सगळीकडे रंगून चर्चिल्या जाऊ लागल्या. सिने नियतकालिके, वर्तमानपत्र आणि गॉसिप कॉलम्समधून त्यांच्या प्रेमाचे किस्से प्रकाशित होऊ लागले. जवळपास ६ वर्षे ते एकमेकांच्या प्रेमात गुरफटले होते. दोघे लवकरच लग्न करतील, असं वाटत असतानाच ‘धडकन’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान शिल्पाची मैत्रिण ट्विंकल खन्नावर अक्षयचं मन बसलं. शिल्पाच्या हे लक्षात येताच तिनं खूप दंगा केला. अक्षयने लग्नासाठी शिल्पाला अशी अट घातली होती, जी तिला मान्य नव्हती, असं बोललं जातं. अखेरीस अक्षयने शिल्पाला सोडचिठ्ठी दिली.

या गोष्टीचा शिल्पाला जबर धक्का बसला. तिनं अक्षयकुमारवर प्रसिद्धी माध्यमातून आग पाखडली. एका मुलाखतीत तिनं बिनधास्तपणे सांगितलं की, ‘अक्षयने ट्विंकल खन्नासाठी मला धोका दिला. लग्नाचं वचन दिलं आणि मग ते मोडलं.’

या मुलाखतीत शिल्पाने अक्षयकुमारला पुरता उघडा पाडला. ‘अक्षय आपल्या प्रत्येक गर्लफ्रेंडचा विश्वास जिंकण्यासाठी तिला रात्री उशिराने देवळात घेऊन जात असे. अन्‌ देवाच्या साक्षीने तिच्याशी लग्न करण्याचं वचन देत असे. पण त्याच्या जीवनात दुसरी मुलगी येताच, ही वचने विसरून तिच्यामध्ये गुंतून जात असे.’

यानंतर अक्षयने २००१ साली ट्विंकलशी लग्न केलं. अन्‌ इकडे शिल्पाच्या जीवनात उद्योगपती राज कुंद्राचं आगमन झालं. राजने शिल्पाला सावरलं. आज हे दोघे फिल्म इंडस्ट्रीतील सुखी दाम्पत्य आहे.