सोनम कपूर सेट करतेय नवा प्रेग्नन्सी फॅशन गोल्स ...

सोनम कपूर सेट करतेय नवा प्रेग्नन्सी फॅशन गोल्स : पहा तिचे फोटोशूट (Birthday Special: Mom-To-Be Sonam Kapoor Is Killing With Her Royal Maternity Style, See Pictures)

आपल्या फॅशन सेन्सने सगळ्यांना घायाळ करणाऱ्या सोनम कपूरचा आज वाढदिवस. तिचा जन्म ९ जून १९८५ ला झाला. २०१८ मध्ये तिने दिल्लीतला बिझनेसमन आनंद अहुजासोबत लग्नगाठ बांधली. आता सोनम लवकरच आई होणार आहे. सोनम इंडस्ट्रीमध्ये फॅशनिस्टा या नावाने प्रसिद्ध आहे. तिच्या गरोदरपणात सुद्धा फॅशनिस्टा हे नाव तिला कसे साजेसे आहे हे सगळ्यांना तिने नुकतेच दाखवून दिले.

सध्या तिचे मॅटरनिटी लूक्स आणि फोटो खूप व्हायरल होत आहे. त्यामुळे सोनम सध्या तिच्या या नव्या लूक्सद्वारे नवे प्रेग्नन्सी फॅशन गोल्स सेट करत असल्याचे दिसून येते. इंडियन असो वा इंडो वेस्टर्न सोनम कोणतेही कपडे तिच्या अनोख्या स्टाइलमुळे खास बनवते. तिच्या वाढदिवसाच्या आधी तिचे काही फोटो व्हायरल झाले होते ज्यात ती स्टाइलिश क्रॉप टॉपमध्ये तिचा बेबी बंप दाखवताना दिसते. त्या फोटोंमध्ये ती फारच सुंदर, स्टाइलिश आणि कम्फ़र्टेबल दिसते.

ऑफ व्हाइट रंगाच्या ड्रेसला साजेसा असा हलका मेकअप सोनमने केलेला दिसतो. तर केसांना स्लीक लूक देऊन ती बांधली आहेत. केसांवरसुद्धा तिने मोती लावले आहेत. सोनमचा हा आउटफिट प्रसिद्ध डिझाइनर अबू जानी-संदीप खोसला यांनी डिझाइन केला होता.

सोनमने ती गरोदर असल्याची माहितीसुद्धा अनोख्या अंदाजात दिली होती. काही दिवसांपूर्वीच ती तिचा बेबीमून साजरा करून परतली. तिथे तिने घालवलेल्या आनंदी क्षणांचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.