बर्थ डे स्पेशल : दिशाला अभिनेत्री नव्हे, तर एअर...

बर्थ डे स्पेशल : दिशाला अभिनेत्री नव्हे, तर एअरफोर्स पायलट बनून देशसेवा करायची होती (Birthday Special: From Wanting To Become An Airforce Pilot To Joining Bollywood, Let’s know Interesting Facts Of Diva’s Life)

दिशा पाटनी आज तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. साल २०१५ मध्ये कॅडबरी डेरी मिल्कच्या एका जाहिरातीपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी दिशा आज बॉलिवूडच्या सर्वात फिट अभिनेत्रींपैकी आहे. अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर तिच्या बोल्ड आणि हॉट अंदाजासाठी चांगलीच ओळखली जाते. सोशल मीडियावरून चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याच निमित्ताने आपण दिशाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत.

दिशा पाटनी उत्तराखंडमधील कमाऊ येथे राहणारी आहे; परंतु तिचा जन्म १३ जून १९९२ रोजी उत्तरप्रदेशातील बरेलीमध्ये झालाय.

दिशा पाटनीचे वडील पोलीस खात्यात डीएसपी आहेत, तर तिची आई पद्मा हेल्थ इन्स्पेक्टर आहे.

दिशाची मोठी बहिण खुशबू आर्मीत लेफ्टनंट आहे.

दिशाने सांगितले होते की, लहानपणी ती अतिशय लाजाळू होती आणि लोकांशी कमी बोलायची.

अभिनेत्री बनण्याचा तिने कधी विचारही केला नव्हता. एअरफोर्समध्ये जाऊन फायटर प्लेन उडवण्याचं तिचं स्वप्न होतं.

बरेली येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिशा पाटनीने नोएडा इथल्या एमिटी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय.

दिशाने मॉडेलिंग करत करिअरला सुरुवात केली. २०१३ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. यात ती पहिली रनरअप ठरली होती.

मॉडलिंग संदर्भात तिचे बरेचदा मुंबईत येणे-जाणे होऊ लागले. त्यानंतर दिशा दिल्लीच्या एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये शिफ्ट झाली.

परंतु जाहिरातींच्या शुटिंगमध्ये ती इतकी बिझी झाली की एमिटी मधील ७५ टक्के उपस्थिती तिला पूर्ण करता आली नाही आणि तिला कॉलेज सोडावं लागलं.

तिला मुंबईला यायचं होतं, परंतु तिचे वडील त्यासाठी तयार नव्हते. शेवटी आईने वडिलांना तयार केले.

दिशा स्वप्नांच्या नगरीत आली आणि काम शोधू लागली. मुंबईला येताना ती फक्त ५०० रुपये घेऊन आली होती, असे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

काही चांगल्या ब्रॅण्ड्‌सच्या जाहिराती केल्यानंतर दिशाला एक सिनेमा मिळाला. ती खुश होती, परंतु नंतर तिला कळलं की तिच्याजागी दुसरं कोणाला तरी घेतलं.

‘लोफर’ या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. या सिनेमात दिशाने एका हैदराबादी तरुणीची भूमिका साकारली होती. मात्र या सिनेमामुळे दिशाला म्हणावी तितकी लोकप्रियता मिळाली नाही.

पण दिशाला हिंदी चित्रपटात काम करायचं होतं. दरम्यान टायगर श्रॉफसोबत एक व्हिडिओ अल्बम करण्यास ती तयार झाली. त्यावेळेस टायगरच्या पदरी दोन सिनेमांचे यश होते.

पुढे जाऊन टायगरसोबत आपलं नातं जुळेल आणि दोघांची जोडी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय ठरेल याचा जरासुध्दा अंदाज त्यावेळेस तिला नव्हता.

त्यानंतर २०१६ मध्ये मात्र दिशाला एक मोठी संधी मिळाली. भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीच्या बायोपिक ‘धोनी- एन अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमात दिशाला महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या सिनेमात दिशाने महेंद्र सिंह धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. सुशांत सिंह राजपूतसोबत ती या सिनेमात झळकली. दिशा पाटनीला ‘धोनी- एन अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातील भूमिकेसाठी बेस्ट डेब्यू अवार्ड मिळाला होता.

वयाच्या २५व्या वर्षी दिशाला ‘कुंग फू योगा’ मध्ये जॅकी चैनसोबत काम करण्याची संधी मिळाली.

हा सिनेमा फारसा चालला नाही, परंतु टाइगर श्रॉफ सोबतच्या ‘बागी 2’ या सिनेमामध्ये त्यांची दोघांची केमिर्स्टी दर्शकांच्या पसंतीस आली आणि सिनेमा यशस्वी ठरला.

त्यानंतर आलेल्या ‘भारत’ आणि ‘राधे’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांत तिला फारसं यश मिळालं नाही, परंतु तरीही तिने फॅन फॉलोइंग भरपूर बनवले.

दिशा आपल्या फिटनेसच्या बाबत अतिशय जागरूक असून आपले फिटनेस व्हिडिओज ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या व्हिडिओंमध्ये ती मजेशीर स्टंट करताना दिसते. या व्यतिरिक्त दिशाचं स्वतःचं युट्यूब चॅनलही आहे, ज्यास चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो.

केवळ ५०० रुपये घेऊन मुंबईला आलेल्या दिशा पाटनीचं नेटवर्थ जवळपास ९० करोड झाले आहे.  तर तिचं वार्षिक उत्पन्न १७ कोटी रुपये आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम दिशा पाटनी

Photo Courtesy: Instagram dishapatani