हॅपी बर्थ डे आमीर खान : रसिकांची मने जिंकणारा ह...

हॅपी बर्थ डे आमीर खान : रसिकांची मने जिंकणारा हिरो (Birthday Special: Aamir Khan’s Superhit Bollywood Films Through Which He Wins The Heart of Everyone)

बॉलिवूडचा सुपरस्टार आमीर खान आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करतो आणि आपल्या भूमिकांमध्ये जीव ओततो. त्यामुळेच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट असं म्हटलं जातं. आज आमीर खानचा ५६ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील त्याच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत आमीरने गजनी, मंगल पांडे, लगान, दंगल… अशा सगळ्याच चित्रपटांतील व्यक्तिरेखा जिवंत केल्या आहेत. म्हणूनच त्याच्या प्रत्येक भूमिका पाहताना त्याच्याजागी इतर कोणत्याही हिरोची कल्पनाच करता येत नाही. आमीर खानचा एखादाच चित्रपट प्रदर्शित होतो परंतु तो यशस्वी ठरतो. त्यामुळे त्याचे चाहतेही त्याच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतात. आज आमीरच्या काही यशस्वी चित्रपटांच्या फ्लॅशबॅकमध्ये जाऊया.

Photo Credit; Instagram

Photo Credit; Instagram

फिल्म – ‘थ्री इडियट्स’

Photo Credit; Instagram
‘थ्री इडियट्स’ या सिनेमाने पडद्यावर कमालच केली. या चित्रपटातील आमीर खानच्या रॅंचोने करोडो प्रेक्षकांचं मन जिंकलं. आजही हा सिनेमा तितक्याच उत्साहाने पाहिला जातो.
फिल्म – पीके

Photo Credit; Instagram
‘पीके’ हा आमीरच्या अभिनयातील अष्टपैलूपणा दाखविणारा चित्रपट ठरला. या सिनेमामध्ये त्याने एका निर्दोष एलियनची भूमिका केली होती, जो पृथ्वीवर येतो, परंतु आपलं कम्युनिकेशन डिव्हाइस चोरी झाल्याने परत जाऊ शकत नाही. ते परत मिळविण्यासाठी त्याला काय काय करावे लागते, हे या सिनेमात दाखवले आहे.
फिल्म – तारे जमीं पर

Photo Credit; Instagram
‘तारे जमीं पर’ या सिनेमातून डिस्लेक्सिया या समस्येचा विषय हाताळला गेला. या चित्रपटातील आमीर खानच्या राम शंकर या एका आर्ट टीचरच्या व्यक्तीमत्त्वाने प्रत्येक मूल हे स्पेशल असतं, हे दाखवून दिलं. डिस्लेक्सियामुळे ८ वर्षांच्या मुलाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि एक शिक्षक त्याला त्यातून बाहेर पडण्यास कशी मदत करतो, हे या चित्रपटातून दाखविले आहे.
फिल्म- दंगल

Photo Credit; Instagram
फिल्म ‘दंगल’ मध्ये आमीर खान ने रेसलर महावीर सिंह फोगाटची भूमिका केली जो आपल्या मुलींना रेसलरची ट्रेनिंग देतो. आपल्या मुलींनी रेसलिंगमध्ये भारताला गोल्ड मेडल जिंकून द्यावे आणि भारताचे नाव जगभर प्रसिद्ध करावे, अशी त्याची इच्छा असते. त्यासाठी तो आपल्या मुलींकडून बेहद मेहनत करून घेतो आणि यशस्वी होतो, असे या चित्रपटामध्ये दाखविले आहे. या चित्रपटातील एका वडिलांची जिद्द आमीरमध्ये पाहता आली आणि चाहत्यांनीही ती पसंत केली.

फिल्म- लगान

Photo Credit; Instagram
ऑक्सरसाठी नामांकन मिळालेला आमिर खानचा ‘लगान’ चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला. आमीर खानच्या फिल्मी करियरमधील ‘लगान’ हा मैलाचा दगड ठरला. यात आमीरने भुवन हे व्यक्तिमत्त्व साकारले होते.
फिल्म- गजनी

Photo Credit; Instagram
‘गजनी’ हा आमिर खानच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक चित्रपट. ज्यास लोकांनी डोक्यावर घेतले. यातील आमीरची भूमिकाही नेहमीपेक्षा अगदीच वेगळी होती. यात त्याने संजय सिंघानिया नावाच्या बिजनेसमॅनची भूमिका केली होती. एका हिंसक एनकाऊंटरनंतर त्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस ची समस्या उद्‌भवते. याच एनकाउंटरमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला मारलं जातं, ज्याचा नंतर तो बदला घेतो, असं दाखविलं आहे.

फिल्म – फना

Photo Credit; Instagram
आमिर खान आणि काजोल यांच्या ‘फना’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सफलता प्राप्त केली. चित्रपटातील गाणी आणि आमिर-काजोलचा अभिनय दर्शकांना खूपच आवडला. यात आमीरने आतंकवादी रेहान रंगवला होता.

कंगनाचे भयंकर वादग्रस्त ट्वीट : म्हणते – टॉयलेट स्वच्छ केले नाही तर गांधीजी आपल्या पत्नीला घराबाहेर काढत