बर्थ डे स्पेशल : बहुआयामी व्यक्तिमत्त्व अनुपम ख...

बर्थ डे स्पेशल : बहुआयामी व्यक्तिमत्त्व अनुपम खेर यांच्याबाबत या १५ गोष्टी (Birthday Special: 15 Things You May Not Know About Bollywood Actor Anupam Kher)

बॉलीवुडसारख्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हरतऱ्हेच्या भूमिका उत्तमरित्या वठवणारे कलाकार अनुपम खेर, यांचा आज वाढदिवस आहे. अनुपम खेर यांनी  सारांश, कर्मा, तेज़ाब, बेटा, दिल, राम लखन, वीर ज़ारा, विवाह, मोहब्बतें, दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे, हम आपके हैं कौन, एम एस धोनी… यासारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांतून इमोशनल, कॉमेडी, सस्पेंस, थ्रिलर… अशा वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या जीवनाशी संबंधित काही मजेशीर गोष्टी जाणून घेऊया.

१) अभिनेता अनुपम खेर यांचा जन्म ७ मार्च १९५५ साली सिमला येथे झाला.
२) अनुपम यांचे वडील पुष्कर नाथ एक काश्मिरी पंडित होते आणि क्लार्क म्हणून काम करत होते.
३) सिमला येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुपम यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) येथून आपले पुढील शिक्षण पूर्ण केले.
४) लहानपणी जीभेला इजा झाल्यामुळे अनुपम खेर हे तोतरे बोलायचे, ते ‘क’ बोलू शकत नव्हते. त्यांच्या या तोतरेपणामुळेच त्यांची गर्लफ्रेंड त्यांना सोडून गेली होती.
५) तोतरेपणामुळे ते आपली गर्लफ्रेंड कविता कपूरला आय लव्ह यू असेही बोलू शकले नाहीत आणि मग रागारागाने त्यांनी ‘तविता तपूर आय हेट यू’ असे म्हटले होते.
६) अभिनय शिकण्यासाठी पंजाबला जायचे म्हणून अनुपम यांनी देवीच्या मंदिरातून १०० रुपये चोरले होते. मुंबईला आल्यानंतरही त्यांना अतिशय संघर्ष करावा लागला. त्या दिवसांत ते एका खोलीत चौघांसोबत भागीदारीत राहत होते.
७) संघर्षाच्या त्या दिवसांत अनुपम खेर यांना मुंबईच्या रेल्वे ट्रॅकवरही झोपावे लागले होते.
८) १९८२ मध्ये ‘आगमन’ नावाच्या चित्रपटापासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पंरतु, १९८४ साली आलेला ‘सारांश’ हा त्यांचा पहिला यशस्वी चित्रपट ठरला.
९) अनुपम यांनी १९८५ साली किरण खेर यांच्याशी लग्न केले होते. किरणशी लग्न करण्यासाठी त्यांनी आपली पहिली पत्नी मधुमालतीला घटस्फोट दिला होता. किरणसोबत लग्न केल्यानंतर त्यांनी किरण व तिच्या आधीच्या नवऱ्याच्या मुलाला सिकंदरला पित्याचे नाव दिले.

१०) ‘हम आपके हैं कौन’ च्या शूटिंग दरम्यान अनुपम खेर यांना लकवा झाला होता आणि डॉक्टरांनी त्यांना दोन महिने आराम करण्याचा सल्ला दिला होता, तरीही त्यांनी चित्रपटाचं शूटिंग चालू ठेवलं होतं.
११) कलाक्षेत्रातील योगदानासाठी २००४ साली अनुपम खेर यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री आणि २०१६ साली पद्म विभूषण अशा अतिशय सन्माननिय पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलेले आहे.
१२) हास्यकलाकार म्हणून पाच वेळा फिल्मफेअर ॲवॉर्ड मिळवणारे अनुपम खेर हे पहिले अभिनेता आहेत.
१३) अनुपम खेर यांनी बॉलीवुड व्यतिरिक्त अमेरिकन, ब्रिटिश आणि चायनीज चित्रपटांतूनही काम केले आहे.
१४) अनुपम खेर यांनी फिल्म ‘ॐ जय जगदीश’ पासून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले.
१५) आई दुलारी देवी हा अनुपम खेर यांचा विक पॉइंट होता. आपल्या आईसोबत बातचित करतानाचे अनेक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते आणि त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्या आईचे हे व्हिडिओ पसंत केले होते.
अनुपम खेर यांना जन्मदिवसाच्या अनेक शुभेच्छा!