केक कापून आणि करणला लिपलॉक करत बिपाशा बसूने अनो...

केक कापून आणि करणला लिपलॉक करत बिपाशा बसूने अनोख्या अंदाजात साजरा केला बेबी शॉवरचा सोहळा (Bipasha Basu’s baby shower: Parents-to-be cut the cake, lock lips to celebrate baby shower)

आपण आई होणार असल्याची घोषणा केल्यापासून बिपाशा बसू सतत चर्चेत असते. सध्या बिपाशा तिच्या प्रेग्नेंसीचा एकेक महिना एन्जॉय करत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असून दररोज तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटचे फोटो शेअर करत असते. एकंदरच बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हर दोघंही आई-वडील होण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

दरम्यान, काल बिपाशा बसूच्या बेबी शॉवर (Bipasha Basu Baby Shower) म्हणजेच डोहाळे जेवणाचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हा बेबी शॉवर सोहळा मुंबईच्या मॉलमध्ये बिपाशाच्या जवळच्या मित्राने आयोजित केला होता, ज्यामध्ये अभिनेत्रीचे काही मित्र आणि जवळचे मोजके लोक उपस्थित होते. तिच्या बेबी शॉवरसाठी, बिपाशाने मऊ गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता आणि ती नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. त्याचवेळी करण सिंग ग्रोव्हर देखील निळ्या रंगाच्या सूटमध्ये जंटलमॅन दिसत होता.

काही दिवसांपूर्वी बिपाशा बसूच्या आईने तिच्यासाठी घरी पारंपारिक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याला बंगालीमध्ये ‘शाध’ म्हणतात. या विधीमध्ये अभिनेत्रीला तिच्या आवडीचे जेवण खाऊ घातले जाते.  या समारंभासाठी  बिपाशाने चमकदार गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली होती, ज्यामध्ये तिने सोनेरी दागिने घातले होते. या लूकमध्ये बिपाशा कमालीची दिसत होती, तसेच तिच्या प्रेग्नेंसी ग्लोने तिच्या लुकमध्ये भर टाकली होती.