पारंपरिक बंगाली लूकमध्ये पार पडले बिपाशा बासूचे...

पारंपरिक बंगाली लूकमध्ये पार पडले बिपाशा बासूचे डोहाळेजेवण (Bipasha Basu Shares Pics From Her Baby Shower, Mom-to-be Bipasha glows in traditional Bengali look)

बॉलिवूड कपल बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर सध्या चर्चेत आहेत. या दाम्पत्याच्या घरात लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. करण आणि बिपाशा लग्नाच्या 6 वर्षानंतर आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे दोघेही खूप आनंदी आहेत आणि आपल्या बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बिपाशा सध्या गरोदरपणाचा काळ आनंदात घालवत आहे. सोशल मीडियावर सुद्धा ती आपल्या बेबी बंपचे प्रदर्शन करत असते.

काल बिपाशाच्या घरी तिचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. हा संपूर्ण कार्यक्रम बंगाली रितीरिवाजांप्रमाणे केला गेला. या कार्यक्रमाचे फोटो बिपाशाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

बिपाशाने आपल्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमासाठी रॉयल लूक केला होता. अभिनेत्री गुलाबी रंगाची साडी, सिंदूर, मोठी बिंदी, सोन्याचे वजनदार दागिने आणि चेहऱ्यावर कमीत कमी मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचे तेज स्पष्ट झळकत होते.

फोटोत करण सिंग ग्रोव्हर बिपाशासोबत खूप आनंदी दिसला. दोघांनी बेबी बंपवर हात ठेवून पोज दिली आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहत फोटो काढले.

बिपाशाने आपल्या आईसोबतचे दोन फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले – मला तुझ्यासारखी आई व्हायचे आहे. खूप प्रेम आई. तसेच तिने आपल्या बहिणीसोबत सुद्धा काही फोटो शेअर केले आहेत.

बिपाशाने एक छोटी व्हिडिओ क्लिप देखील शेअर केली आहे ज्यामध्ये तिची बहिण डोहाळेजेवणाचे विधी करताना दिसत आहे. चाहत्यांनी बिपाशाच्या फोटोंवर प्रेम व्यक्त करत त्यांच्या मुलासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.