बिपाशा बासुच्या मालदीव येथील बोल्ड आणि रोमँटिक ...

बिपाशा बासुच्या मालदीव येथील बोल्ड आणि रोमँटिक फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढवले… (Bipasha Basu Rising The Temperatures on Social Media, Shares Maldives Vacation’s Hot And Romantic Photos)

बॉलीवुडमधील बंगाली ब्यूटी बिपाशा बासु काही दिवसांपूर्वी पती करन सिंह ग्रोवरचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने मालदीवला गेलेली होती. बर्थ डे सेलिब्रेशन संपलेले आहे परंतु बिपाशा मात्र अजूनही मालदीवलाच आहे असे वाटते. बिपाशाने इंटरनेटवर प्रदर्शित केलेले मालदीवमधील सेलिब्रेशनचे रोमँटीक आणि बिकिनीतील फोटो सर्वत्र चांगलेच व्हायरल होत आहेत.
बिपाशाने तिचे लेटेस्ट फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंत ती पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट बिकीनीमधे दिसत असून सोबत तिने नेट शर्ग घेतलेले आहे.

या आधीही बिपाशाने स्वतःचे बिकीनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पंरतु आताच्या लेटेस्ट फोटोंमधील बिपाशाच्या हॉटनेसने चाहत्यांना स्तिमित केले आहे.

बिकिनीतील आपल्या फोटोंसाठी बिपाशाने ‘लव युवरसेल्फ’ म्हणजे स्वतःवर प्रेम करा, अशी कॅप्शनही लिहिली आहे.

एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या बिपाशा आणि करनला जगाचा विसर पडलेला आहे.

या फोटोमध्ये बिपाशा आपला पती करन सिंह ग्रोवरवर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

त्यांचे हे फोटो चाहत्यांना अतिशय आवडत असून चाहत्यांकडून उभयतांना कमेंट्‌सही मिळत आहेत.

एका यूजरने कमेंट केली – सुपर हॉट टी, तर कोणी ‘उफ हॉटनेस’ असं म्हटलं आहे.

कोणी हॉटी तर कोणी तिला गॉर्जियस असं म्हटलं आहे.

आजही ४२ वर्षीय बिपाशा आपल्या सीजलिंग हॉट फोटोंनी चाहत्यांना वेड लावत आहे, यात काही शंका नाही.

बिकीनी घालून बिपाशाने वेगवेगळ्या अंदाजात अतिशय स्टायलिश आणि हॉट पोज दिल्या आहेत.

बिपासा आणि करण सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत आपले फोटो शेअर करत असतात.

करन सिंह ग्रोवर आणि बिपाशाचे फोटो चाहत्यांना वेड लावत आहेत.

बीचच्या किनाऱ्यावर पोज देताना बिपाशा.

फोटो क्रेडिट: इन्स्टाग्राम