गरोदरपणाच्या अफवांवर बिपाशा बसुने सोडले मौन… (B...

गरोदरपणाच्या अफवांवर बिपाशा बसुने सोडले मौन… (Bipasha Basu Breaks Silence On Pregnancy Rumors)

बॉलिवूडची डस्की ब्यूटी बिपाशा बसु तिच्या प्रेग्नेंसीच्या बातमीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिपाशा बसुचं वाढलेलं वजन पाहून तिच्या चाहत्यांनी ती गरोदर असल्याचा अंदाज लावला आहे. परंतु बिपाशाने अलीकडेच आपण गरोदर नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे.

बिपाशा बसुने अलिकडेच आपल्या मुलाखती दरम्यान ती गरोदर नसून त्यासंबंधीत सर्व बातम्या ह्या अफवा असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नाही तर तिचं वजन वाढलं की अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर हेडलाइन्स बनतात, असंही ती म्हणाली.

‘फिर हेरा फेरी’, ‘बचाना ऐ हसीनों’, ‘ऑल द बेस्ट: फन  बिगिन्स’ आणि ‘धूम-3’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या बिपाशाने २०१६ साली टी.व्ही. कलाकार करण सिंह ग्रोवर याच्यासोबत लग्न केले. त्यानंतर जेव्हा जेव्हा ती तब्येतीने झालेली दिसली, चाहत्यांनी लगेचच ती गरोदर असल्याची बातमी पसरवली. परंतु अशाप्रकारच्या बातम्यांकडे ती लक्ष देत नाही.

आपल्या गरोदरपणाबाबतच्या अफवांबद्दल खुलेपणाने बोलताना तिने सांगितले की, तिचे चाहते तिला ‘फिटनेसची ॲम्बेसेडर’च्या रुपात पाहतात. परंतु काही वेळा ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःचं आयुष्य मुक्तपणे जगते. तिने तिची तब्येत बरी नसल्याचेही सांगून पाहिलं परंतु जोपर्यंत चाहते तिच्या मांडीवर बाळाला पाहणार नाहीत, तोपर्यंत अशा चर्चा होतच राहणार.

माझ्या चाहत्यांना माझी काळजी वाटते. माझं कुटुंब वाढावं, असा ते विचार करतात. परंतु या अफवांचा नकारात्मक परिणाम माझ्यावर होऊ नये, जे व्हायचं ते होणारच आहे, असे बिपाशानं म्हटलं आहे.

मागच्याच महिन्यात बिपाशाने हिंदी चित्रपटसृष्टीतील आपली २० वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. या काळात तिने आठवणीत राहतील अशा अनेक भूमिका निभावल्या. आपल्या अभिनयाच्या विसाव्या वर्धापनदिनी ४२वर्षांच्या बिपाशाने तिच्या इन्स्टाग्रामवर संदेशासह एक पोस्ट देखील शेअर केली होती.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम