लग्नाच्या 6 वर्षांनंतर आईबाबा होणार बिपाशा बसू ...

लग्नाच्या 6 वर्षांनंतर आईबाबा होणार बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर, लवकरच करणार अधिकृत घोषणा (Bipasha Basu And Karan Singh Grover Expecting Their First Child, Couple Will Make Official Announcement Soon)

अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर अनेकदा जोडीने वेगवेगळ्या इव्हेंटस , कार्यक्रमांना उपस्थित राहतात. पण गेले काही दिवस ते कॅमेऱ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बिपाशा गरोदर असल्याची चर्चा सुरु होती. ही बातमी लपण्यासाठी ती पापाराझींपासून दूर राहत होती. पण आता बिपाशा गरोदर आहे ही बातमी खरी असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बिपाशा आणि करणच्या लग्नानंतर सहा वर्षांनी त्यांच्या घरात नवा पाहुणा येणार आहे.

पिंकविलाने करण आणि बिपाशा आईवडील होणार असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. लवकरच ते याबाबत घोषणा करतील असा अंदाज बांधला जात आहे. या बातमीने त्यांचे चाहते खूप खुश झाले आहे. कमेंटद्वारे अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

काही दिवसांपूर्वी बिपाशा आपल्या कुटुंबियांसोबत डिनर डेटवर गेली होती तेव्हाचे तिचे काही फोटो  सोशल मीडियावर व्हायरल झाले. नेहमी स्किन फिट कपडे घालणारी बिपाशा या फोटोंमध्ये मात्र सैल कपडे घालून दिसली. त्यावरुन चाहत्यांनी ती गरोदर असल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली होती.

बिपाशा आणि करणची भेट ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती आणि त्यानंतर दोघांनी डेट करायला सुरुवात केली. खूप वर्षे डेट केल्यावर त्यांनी 2016 मध्ये लग्न केले. या दोघांच्या लग्नाला आता 6 वर्षे झाली असून ते लवकरच आईबाबा होणार असल्याचे बोलले जात आहे.