बिकिनी, हाय हिल्स घालून देबिना बॅनर्जीने केले स...

बिकिनी, हाय हिल्स घालून देबिना बॅनर्जीने केले सगळ्यात जास्त बोल्ड फोटोशूट… ट्रोलर्स चित्कारले, ‘अगं, तू सीतामाई झाली होतीस. थोडी तरी लाज बाळग…’ (Bikini…High Heels… Mom-To-Be Debina Bonnerjee’s Bold Maternity Photoshoot Goes Viral, Trollers Say- You Played Seeta On TV, You Should Be Ashamed)

टेलिव्हिजनची सीता म्हणजेच देबिना बॅनर्जी दुसऱ्यांदा आई होणार आहे. एप्रिलमध्ये, पहिल्या मुलीच्या लियानाच्या जन्मानंतर अवघ्या चार महिन्यांत, तिने तिची दुसरी गर्भधारणा जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तेव्हापासून तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे ती सतत चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या ब्लॉगद्वारे तिचा मातृत्वाचा प्रवास आणि गरोदरपणाचे अनुभव शेअर करते. तसेच तिच्या बेबी बंपचे फोटो आणि व्हिडिओ देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. पुन्हा एकदा तिने एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिचे मॅटर्निटी फोटोशूट करताना दिसत आहे. तिचे हे मॅटर्निटी फोटोशूट इतके बोल्ड आहे की त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

या व्हिडिओमध्ये देबिनाने ब्रॅलेट आणि शॉर्ट्स घातलेली दिसत आहे. तिने शर्ट काढला असून तिचा बेबी बंप दिसत आहे. बोल्ड स्टाईलमध्ये हाय हिल्स घालून देबिनाने तिची बॉडी एक्सपोज करताना एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. पण तिचा हा बोल्डनेस सोशल मीडिया यूजर्सना पसंत पडलेला नसून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

एका यूजरने नाराजी व्यक्त करत लिहिलंय, ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे, ही आपली भारतीय संस्कृती नाही’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले ‘अगं, तू सीतामाई झाली होतीस. थोडी तरी लाज बाळग…’ काही लोकांनी तिला ट्रोल देखील केले आहे. याशिवाय लोक तिला सतत ट्रोल करताना दिसत आहेत आणि सोशल मीडियावर तिला खूप नकारात्मकतेचा सामना करावा लागत आहे.

लग्नाच्या 11 वर्षानंतर देबिना आणि गुरमीत एप्रिलमध्ये एका मुलीचे पालक झाले. त्याच वेळी, आता हे जोडपे लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करणार आहे. दुसऱ्या गरोदरपणापासून त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात असले तरी दोघी नेहमीच ट्रोलला सडेतोड उत्तर देतात.