कंगना रणौतने ओढवून घेतलेले वाद; नाव पडलंय् कॉन्...

कंगना रणौतने ओढवून घेतलेले वाद; नाव पडलंय् कॉन्ट्रोव्हर्सी क्विन (Biggest Controversies Of Bollywood Queen Kangana Ranaut Which Made Her Controversy Queen)

बॉलिवूड क्विन म्हणून ख्यातनाम असलेली कंगना रणौत आता कॉन्ट्रोव्हर्सी क्विन म्हणून गाजतेय्‌. हृतिक रोशन, करण जोहर, आलिया भट्ट अशा गाजलेल्या लोकांशी पंगा घेऊन तिनं वाद ओढवून घेतले आहेत. तिचे हे वाद म्हणजे ‘आ बैल मुझे मार’, अशी स्थिती म्हणायला हरकत नाही.

हृतिक रोशन
काही दिवसांपूर्वीच कंगना आणि हृतिक यांच्या कथित प्रेमप्रकरणाचा वाद इतका वाढला की, ती पुन्हा चर्चेत आली. कंगनाने हृतिकला ‘सिली एक्स’ म्हटले नि या वादास सुरुवात झाली. हे प्रकरण पुढे इतकं वाढलं की, दोघांनी एकमेकांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या.

करण जोहर
निपोटिझम्‌ या विषयावर कंगना आणि करण जोहर यांच्यातला वाद चांगलाच रंगला होता. करणच्या कार्यक्रमात येऊन तिने त्याच्यावरच चित्रसृष्टीत निपोटिझम्‌ पसरविण्याचा आरोप केला. कंगनाचं हे बेधडक वक्तव्य अनेकांना खुपलं. पण ती कुणाचीही भिडमुर्वत ठेवत नाही. कंगनाच्या वक्तव्यावर करणने ‘महिला कार्ड’ आणि ‘व्हिक्टीम कार्ड’ वापरणारी कलाकार, असे वक्तव्य केले आणि चित्रसृष्टी सोडून जाण्याचा सल्ला दिला. तेव्हा ‘ही इंडस्ट्री म्हणते तुझ्या पापांनी दिलेला स्टुडिओ नाहीये. मग कशाला सोडू?’ असं बेधडक विधान करून पुन्हा वादात उडी घेतली.

सुशांत सिंह राजपूत
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने विनाकारण त्या प्रकरणात उडी घेऊन किती गहजब माजविला होता, ते सर्वांना ठाऊक आहेच. बॉलिवूडमध्ये पक्षपात केला जातो, गुणीजनांना पुढे येऊ दिले जात नाही, त्यांचा आत्मविश्वास खच्ची केला जातो; यांसारखे आरोप करून तिने वाद ओढवून घेतला होता. या निमित्ताने तिने एक व्हिडिओ प्रसारित केला व त्यामधून तिने केलेल्या निपोटिझम्‌च्या विधानांवरून दीर्घकाळ चर्चा चालली होती.

तापसी पन्नू
अलिकडेच तापसी पन्नूच्या घरी व कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली. त्याच्यावर तिने ट्वीट केले की, ‘२०१३ साली पडलेल्या धाडीच्या आठवणी जाग्या झाल्या.’ पुढे ती म्हणाली, ‘अब वो सस्ती नही रही है.’ झालं, कंगनानं यावरून वाद सुरू केला. कंगनानं ट्वीट केलं की, ‘तुम हमेशा सस्ती ही रहोगी…’ वगैरे वगैरे. या सस्ती शब्दाचं रहस्य असं आहे की, सुरुवातीला जे वाद झाले, त्या तिने तापसीला नेहमीच सस्ती कॉपी म्हणून हिणवलं आहे.

कास्टींग काऊच
कंगनाने एका नियतकालिकास मुलाखत देऊन चित्रसृष्टीत चालणाऱ्या कास्टींग काऊच अर्थात्‌ काम देण्यासाठी केलेलं लैंगिक शोषण या संबंधात वादग्रस्त विधान केलं होतं. ती म्हणाली होती की, कित्येक यशस्वी अभिनेत्रींना सिनेमात काम मिळवण्यासाठी दिग्दर्शक किंवा हिरोला खूश करावं लागतं. काही सुपरस्टार्सना वाटतं की, हिरॉईनने सेटवर त्यांच्याशी बायकोसारखं वागावं. या संदर्भात परवीन बाबी आणि झीनत अमान यांचेही तिनं दाखले दिले, अन्‌ मोठा वाद ओढवून घेतला होता.

दिलजीत दोसांझ
दिल्लीत चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात कंगनाने दिलजीत दोसांझला कडक शब्दात सुनावले अन्‌ वाद ओढवून घेतला. आपल्या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं होतं की, मी गप्प आहे म्हणजे तो माझा कमकुवतपणा आहे, असं समजू नकोस. तू खोटं बोलून निष्पाप लोकांना भडकवतो आहेस. शाहीन बाग प्रमाणे या आंदोलनाचे गुपित फुटेल तेव्हा मी मोठं भाष्य करीन अन्‌ तुमच्या तोंडाला काळं फासीन.

पाकिस्तान
पाकिस्तानच्या संदर्भात कंगनानं केलेलं असंच एक बेधडक विधान व्हायरल झालं होतं. पुलवामा हल्ल्यानंतर तिनं म्हटलं होतं की, पाकिस्तानवर प्रतिबंध घालणे हा तोडगा नसून पाकिस्तानचा विनाश करणे हाच तोडगा आहे.

कंगना रणौतचं तोडफोड झालेलं ऑफिस दुरूस्त करायला कोणीच पुढे येत नाही; कारण काय?