बिग बॉस मराठीच्या ४ थ्या पर्वाचे घर कसे असेल? प...

बिग बॉस मराठीच्या ४ थ्या पर्वाचे घर कसे असेल? पाहा घराचा फस्ट लूक (bigg boss marathi 4 house inside photos)

‘बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता याचे चौथे पर्व सुरू झाले आहे. या पर्वाची उत्कंठा संपली असून कधी एकदा बिग बॉसच्या घराचे दार उघडते आहे अशी अवस्था प्रेक्षकांची झाली होती. अखेर बिग बॉस मराठी या शोच्या घराचा लूकही प्रेक्षकांसमोर आला आहे. मराठी बिग बॉसच्या घराला दिलेला मराठमोळा लूक प्रेक्षकांचा आवडल्याचं दिसत आहे.

वाद, भांडण, दंगा, प्रेम याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा खेळ बराच लोकप्रिय आहे. या खेळाला दरवर्षी एक थीम दिली जाते. यंदाची थीम आहे ‘ऑल इज वेल’. या थीमला अनुसरून यंदाचं घर साकारण्यात आलं आहे. पाहुया या सुंदर आणि नेत्रदीपक घराचे फोटो –

दरवर्षी प्रमाणेच यंदाही बिग बॉसच्या दारात तुळस आणि लिंबू मिरची आहे.

बिग बॉसचा लिविंग एरिया कायमच बघण्यासारखा असतो. यंदा लिविंग एरियामध्ये मोगऱ्याच्या फुलांचे झुंबर आहे. तर आकर्षक रंग संगतीचे सोफे आणि उशा आहेत. 

दरवर्षी किचन मध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. यंदा किचनच्या भिंतीवर आकर्षक मोदक लावण्यात आले आहेत. याशिवाय मातीची बरीच भांडी आहेत.

ज्या डायनिंग टेबलवर बसून गॉसिप ते भांडणं असं बरच काही चालतं तो टेबल यंदा विविधरंगी फुलांनी सजला आहे. 

दर आठवड्याला कॅप्टन होण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतो. यंदा कॅप्टनला अशी विशेष जांभळ्या रंगांची खोली आहे. लाल रंगांचे पोपट आणि लाल बेड ही यंदा बेडरूमची खासियत आहे.

तर दुसऱ्या बेडरूमला हिरव्या रंगाने सजवण्यात आले आहे. त्यावर बगळ्यांची नक्षी आहे.  आता कोणता बेडरूम मुलांकडे जातोय  आणि कोणता मुलींकडे हे लवकरच कळेल.

यंदा बिग बॉसने बाथरूमला जंगलाप्रमाणे सजवले आहे.

यंदाचे खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे बाल्कनी. यंदा बिग बॉस च्या छतावर एक बाल्कनी असणार आहे. त्यावर भोवरे लावण्यात आले आहे.

अनेक टास्कला रंगत आणणारा हाच तो स्विमिंग पूल. यंदा तिथे फेटे घातलेले काही चेहरे प्रेक्षकांवर नजर ठेवत आहे.  

आज रात्री हे घर स्पर्धकांसाठी खुले होणार आहे.