बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व फक्त २ दिवसांवर̷...

बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व फक्त २ दिवसांवर… (Bigg Boss Marathi 3 To Begin Soon Mahesh Manjrekar Announces)

छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस मराठी’ चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ‘बिग बॉस मराठी’ च्या ३ऱ्या सिझनसाठी आता फकत २ दिवस उरले आहेत. मात्र अद्याप या सिझनमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार हे कळाले नाही. अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. चाहते अनेक तर्क लावताना दिसत आहेत. अशात ‘बिग बॉस मराठी’ च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढवली आहे.

Bigg Boss Marathi 3

कलर्स मराठी वाहिनीने नुकतेच दोन प्रोमो त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. हे दोन्ही प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. पहिला प्रोमो पोस्ट करत त्यांनी कॅप्शन दिली आहे, “तमाम पोरींच्या काळजाची धडधड आता वाढणार… जेव्हा ‘त्याची’ एन्ट्री होणार…पाहा.”

Bigg Boss Marathi 3

कलर्सने शेअर केलेल्या दुसऱ्या प्रोमोत एक अभिनेत्री दिसत आहे ती ‘मीमी’ या चित्रपटातील ‘परम सुंदरी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या प्रोमोला, “तिच्या अदा हटके… तिची चाल काळजाचा ठोका चुकवे… कोण असेल ती पाहा” अशी कॅप्शन दिली आहे.

‘बिग बॉस मराठी ३’ चे हे दोन्ही प्रोमो पाहिल्यानंतर, काही चाहत्यांनी अनेक तर्क लावण्याचा प्रयत्न केलाय परंतु प्रत्यक्षात हे कलाकार कोण असणार आहेत हे कोडे तर १९ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजताच उलगडणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षक आतुरतेने शो सुरू होण्याची वाट बघत आहेत. या सिझनचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेता महेश मांजरेकर करताना दिसतील. लवकरच आपण आपल्या आवडत्या कलाकारांना बिग बॉसच्या घरात आपले मनोरंजन करताना पाहणार आहोत.