सोफिया हयात शरीर आणि आत्म्याची शुद्धी करायला गे...

सोफिया हयात शरीर आणि आत्म्याची शुद्धी करायला गेली, अन् हॉस्पिटलमध्ये भरती झाली (Bigg Boss Fame Sofia Hayat Hospitalised After Spiritual Fasting)

ग्लॅमरस जग सोडून अध्यात्माच्या वाटेला लागलेली मॉडेल आणि अभिनेत्री सोफिया हयातला लंडनला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सोफियाने शरीराच्या शुद्धीसाठी उपवास केला होता. पण तो तिलाच भारी पडला. सोफियाची या उपवासामुळे तब्येत बिघडली.

सोफियाने सांगितले की, ती उपवास आणि एनिमा द्वारे शरीर साफ करण्याचा सराव करत होती. तो तिच्या साधनेचाच एक भाग होता. पण यामुळे तिच्या शरीरात मीठाची मात्रा कमी झाल्याने ती बेशुद्ध झाली. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

सध्या ती ठिक आहे. पण याबाबत ती म्हणाली की, माझे शरीर उपवासासाठी अजून तयार नसल्याने मला तो धरायला नको होता. मला माझ्या शरीरातून मिळालेले संकेत ओळखता आले नाहीत. मी माझ्या नर्सला 5 पाकिटं मीठ देण्यास सांगितले आहे. आता मी उपवास करत नसून प्रकृतीत सुधारणा करत आहे.

सोफियाने 2014 ला सुद्धा अशा प्रकारचा उपवास केला होता. पण तेव्हा तिला कोणताच त्रास झाला नाही. याउलट तेव्हा तिला खूप बरे वाटले होते.

सोफियाने पुढे सांगितले की, ‘मी हॉस्पिटलमध्ये माझा मित्र जो एक अध्यात्मिक गुरु आहे त्याच्याशी बोलले. त्याच्या सल्ल्यानुसार मी हा उपवास सोडला आहे. त्याने माझे शरीर या उपवासाला साथ देत नसल्याचे सांगितले. आता मी हॉस्पिटलमधून घरी आली आहे पण हॉस्पिटलचे बील पाहून माझे डोळे दिपले होते. पण नशीब इथे युकेला माझा आरोग्य विमा काढला आहे.”