शहनाज गिलने लग्नाबद्दल केले खळबळजनक विधान, चाहत...

शहनाज गिलने लग्नाबद्दल केले खळबळजनक विधान, चाहत्यांची तुटली मनं (Bigg Boss Fame Shehnaaz Gill Said Such a Thing about Marriage, It May Break Heart of Fans)

पंजाबची कतरीना कैफ अशी ओळख असलेली बिग बॉस फेम शहनाज गिलचे नाव एकेकाळी दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत जोडले गेले होते. चाहत्यांनाही सिद्धार्थ आणि शहनाज गिलची जोडी खूप आवडायची. त्यामुळेच त्यांची जोडी सोशल मीडियावर सिडनाज या टोपणनावाने प्रसिद्ध होती. पण कदाचित त्यांची जोडी अखंडीत राहणे विधात्यालाच मान्य नव्हते त्यामुळे अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा अकस्मित मृत्यू झाला. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने शहनाज पूर्णपणे खचून गेली होती. सिद्धार्थच्या मृत्यूच्या दु:खातून सावरण्यासाठी शहनाजला बराच वेळ लागला. आता नुकतेच शहनाज गिलने आपल्या लग्नाबद्दल वक्तव्य केले आहे.  

‘बिग बॉस 13’ मध्ये दिसलेली शहनाज गिल सध्या तिचा चॅट शो ‘देसी वाइव्हज विथ शहनाज गिल’ चे सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्ये ती मोठ्या सेलिब्रिटींसोबत गप्पा मारताना दिसते. अलीकडेच YouTuber भुवन बाम तिच्या शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. या शोमधील संभाषणात शहनाजने आपल्या लग्नाबद्दल आणि भविष्यातील प्लॅनिंगबद्दल अनेक रंजक गोष्टी शेअर केल्या.

शहनाज गिलने तिचं करीअर, रिलेशनशिप, लव्ह मॅरेज अशा अनेक विषयांवर दिलखुलासपणे गप्पा मारल्या. यासोबतच तिने असेही सांगितले की, सेलिब्रिटी असूनही ती कधीच दारू पीत नाही. शहनाजशी बोलत असताना, भुवन बामने प्रथम त्याच्या 15 वर्षांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले तसेच तो आपले YouTube चॅनेल आणि सर्व काही आपल्या प्रेससीला देईल असेही म्हणाला.

आपल्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल बोलताना शहनाज गिल म्हणाली की, आयुष्यात पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण भविष्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी तयार असले पाहिजे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिला अजूनही अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि ते ती करत आहे. भविष्यातही ती काम करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. चूकन जरी भविष्यात तिला काम मिळणे बंद झाले तर भविष्यात तिला पैशासाठी कोणाकडेही जावे लागणार नाही याची ती काळजी घेत आहे.

यानंतर अभिनेत्री म्हणाली की वाईट भविष्यामुळे मला लग्न करावे लागेल अशी परिस्थिती येऊ नये. ती म्हणाली की तिचा आता लग्न वगैरेवर विश्वास नाही. तिला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे ती सध्या लग्नाच्या मूडमध्ये नाही. याआधी जेव्हा शाहिद कपूर तिच्या शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता तेव्हा शहनाज म्हणाली होती की, तिला भावाची नाही तर बॉयफ्रेंडची गरज आहे.

शहनाजने नुकतेच एक नवीन घर घेतले आहे आणि या घरात प्रवेशासाठी काही कडक नियम केले आहेत. यासोबतच भावाच्या सांगण्यावरूनच हे यूट्यूब चॅनल सुरू केल्याचेही तिने सांगितले.

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची ‘बिग बॉस 13’ मध्ये भेट झाली होती, या शोमध्ये दोघांच्या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते. या शोनंतरही या दोघांना अनेक प्रसंगी एकत्र पाहिले गेले.  त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली, पण सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज पूर्णपणे एकटी पडली.