सई लोकूरने प्रेक्षकांना केला राम राम, का व कुठे...

सई लोकूरने प्रेक्षकांना केला राम राम, का व कुठे घ्या जाणून (Bigg Boss Fame Sai Lokur Takes Break From Social Media)

काही कलाकार टीव्ही मालिका किंवा चित्रपटांमध्ये दिसत नसले तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यामुळे त्यांच्या चाहता वर्ग काही कमी होत नाही. ते आपल्या आवडत्या कलाकाराला सोशल मीडियावर फॉलो करुन त्यांच्याबद्दल सर्व माहिती अपडेट ठेवत असतात. बिग बॉस मराठी फेम सई लोकूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअऱ केली आहे. ज्यात तिने आपल्या प्रेक्षकांना राम राम केले आहे.


अभिनेत्री सई लोकूर बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर आपला चाहता वर्ग कायम ठेवण्यासाठी ती सोशल मीडियावर फार सक्रिय असायची. तिथे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठया घटना चाहत्यांसोबत शेअर करायची. तिने आपल्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक विधी सोशल मीडियावर शेअर केला होत्या. पण आता सईने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली.


त्यात ती म्हणाली, “मला गेल्या कित्येक दिवसांपासून एक गोष्ट करायची होती आणि अखेर आता मी ते करत आहे. मी पुढचे काही दिवस इन्स्टाग्रामपासून ब्रेक घेणार आहे. मला हा ब्रेक घेण्याची फार गरज आहे.मला माझ्या स्वत:साठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे आता मी तुमची रजा घेते. मी पुन्हा सज्ज झाल्यावर नक्कीच परत येईन. त्याबरोबर तुमच्यासाठी खूप काही घेऊनही येईन. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. खूप खूप प्रेम. सई”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.


सईच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तु परतण्याची आम्ही वाट पाहू असे त्यांनी कमेंटमध्ये म्हटले आहे. सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने पारंबी, नो एन्ट्री पुढे धोका आहे, कीस किसको प्यार करु, जरब, मी आणि यू या चित्रपटात काम केले आहे.