अभिनेता राजीव पॉल वयाच्या 52 व्या वर्षी दुसऱ्या...

अभिनेता राजीव पॉल वयाच्या 52 व्या वर्षी दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर (‘Bigg Boss’ Fame Rajev Paul Gets Married Again At The Age Of 52, Shares Picture With His Bride)

‘ससुराल सिमर का 2’मध्ये गिरिराजची भूमिका साकारणारा अभिनेता राजीव पॉल पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकला आहे. आपल्या आयुष्याच्या नव्या सुरुवातीबद्दल सांगण्यासाठी अभिनेत्याने लग्नातला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

बिग बॉस फेम राजीव पॉल आपले वैयक्तिक आयुष्य फारसे सर्वांसमोर मांडत नाही. सोशल मीडियावर सुद्धा तो फारसा सक्रिय नसतो. पण यावेळी अभिनेत्याने आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाची गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली. ती आनंदाची बातमी म्हणजे ५२ वर्षीय राजीव पॉलने आपल्या मैत्रिणीसोबत लग्न केले आहे. राजीवने करवा चौथच्या शुभ मुहूर्तावर लग्न केले.  आपल्या लग्नाचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला.

राजीवने शेअर केलेल्या फोटोत आपल्या पत्नीबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. तसेच फोटोत त्याने आपल्या पत्नीचा चेहरा दाखवणे सुद्धा टाळले. राजीव पॉलचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी राजीवने टीव्ही अभिनेत्री डेलनाज इराणीशी लग्न केले होते. पण 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

फोटोत नवरदेवाच्या पोशाखात राजीव खूप खुश दिसत आहे. फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्याने, दूधाने तोंड पोळले तर ताकसुद्धा फुंकून पितात, पण प्रयत्न तर करु शकतो….पुन्हा एकदा….सर्व वचने…प्रथा-परंपरा… एवढे सर्वजण लग्न करत आहेत, कोणी करवा चौथ साजरा करत आहे….असो, आता आमची सुद्धा वेळ आली…सर्वांसाठी खूप आनंद….

राजीवच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो सध्या सुपरहिट शो ससुराल सिमर का सीझन 2 मध्ये गिरीराजच्या भूमिकेत दिसत आहे.