धोकेबाज म्हणत ‘बिग बॉस’फेम असीम रियाज ने सलमान ...

धोकेबाज म्हणत ‘बिग बॉस’फेम असीम रियाज ने सलमान खानला केले लक्ष्य (‘Bigg Boss’ Fame Asim Riaz Targeted Salman Khan, Without Naming He Called Him a Cheater)

बॉलिवूडमध्ये ज्याच्या डोक्यावर सलमान खानचा हात असेल त्याचे करीअर हिट होते असे म्हटले जाते. सलमान अनेकदा लोकांच्या मदतीसाठी धावून येतो. अनेकांना त्याने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याची संधी दिली आहे. असे असूनही सलमानचे नाव अनेकदा वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत असते. सलमाने बिगबॉस १३ मधली स्पर्धक शहनाज गिलला आपल्या आगामी कभी ईद कभी दिवाली या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. अशातच आता त्याच सीजनमध्ये फर्स्ट रनर अप ठरलेल्या असीम रियाजने मात्र सलमानचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या त्याला धोखेबाज असा टोला लगावला आहे.

‘बिग बॉस 13’ चा फर्स्ट रनर अप असीम रियाझची सोशल मीडियावरील चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. एक मॉडेल असण्यासोबतच असीम एक अप्रतिम रॅपर देखील आहे आणि त्याचे अनेक म्युझिक व्हिडिओ देखील रिलीज झाले आहेत. आता असीमचे नाव पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे.

असीम अचानक चर्चेत येण्यामागे सलमान खान कारण असल्याचे म्हटले जात आहे. मध्यंतरी असीन सलमानच्या कभी ईद कभी दिवाली या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोलले जात होते. पण नंतर असीमच्या जागी आयुषला घेतल्याचे म्हटले जाऊ लागले. मात्र, नंतर आयुषही चित्रपटातून बाहेर पडल्याची बातमी आली.

आता असीमने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, माझ्या वडिलांनी मला उद्योग क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वाकडून एका प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे वचन दिले होते.वर्षभराहून अधिक काळ त्यांनी या प्रकल्पाच्या प्रचारासाठी माझ्या नावाचा वापर केला, याला अनेक माध्यम संस्थांनी दुजोरा दिला, पण ते आश्वासन पूर्ण झाले नाही. मला एवढेच सांगायचे आहे की, अशी खोटी आश्वासने मला वाकवू शकत नाहीत. त्यांनी जरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी मला जे साध्य करायचे आहे त्यापासून ते मला रोखू शकत नाहीत.

असीमच्या या पोस्टचा संबंध सलमान खानशी लावला जात आहे कारण फेब्रुवारीमध्ये सलमान खान व्यतिरिक्त कभी ईद कभी दिवाली चित्रपटात पूजा हेगड़े, जहीर इकबाल आणि असीम रियाज मुख्य भूमिकेत असतील अशी बातमी व्हायरल झाली होती. पण नंतर असीमला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळेच असीमने नाव न घेता सलमानला धोकेबाज म्हटले आहे.