कतरीना कैफचा बिग बॉसच्या मंचावर सलमान खानसोबत ‘...

कतरीना कैफचा बिग बॉसच्या मंचावर सलमान खानसोबत ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर बेधुंद नाच (Bigg Boss 16: Salman Khan And Katrina Kaif Set The Floor On Fire With Their Dance Moves On ‘Tip Tip Barsa Paani’)

खऱ्या आयुष्यात कतरीना कैफ आणि सलमान खानचे मार्ग वेगळे झाले असले तरी आजही चाहत्यांना या दोघांना एकत्र एका मंचावर पाहिल्यावर खूप आनंद होतो. ब्रेकअपनंतरही दोघांमधील मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत.

कतरीना लवकरच बिग बॉसमध्ये फोनभूतच्या प्रमोशनसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा एपिसोड आज रात्री प्रदर्शित होणार आहे.

मागच्या आठवड्यात सलमानला डेंग्यूची लागण झाल्यामुळे विंकेंडचा वॉर होऊ शकला नव्हता. त्याच्या जागी करण जोहरने उपस्थिती लावलेली. आता नव्याने आलेल्या प्रोमोमध्ये कॅट बिग बॉसच्या मंचावर आली असून ती सलमानसोबत टिप टिप बरसा पानी या गाण्यावर नाचत आहे.

यावेळी कतरीनाने पिवळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातलेला पाहायला मिळतो तर सलमानने निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान कतरीनासोबत स्टेप्स मॅच करताना दिसत आहे.

कतरीना आपला आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट फोन भूतमध्ये ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे. ईशान आणि सिद्धांतसुद्धा बिग बॉसच्या मंचावर धमाल करायला येणार आहेत.