बिग बॉस १६च्या घरात होणार शेखर सुमनची एन्ट्री :...

बिग बॉस १६च्या घरात होणार शेखर सुमनची एन्ट्री : तो सगळ्यांचे मुखवटे उतरवणार का? (Bigg Boss 16: New Twist… Now Shekhar Suman To Join Salman Khan’s Reality Show, Deets Inside)

बिग बॉस या कार्यक्रमात अतर्क्य घटना घडतात. कोणत्याही दैनंदिन मालिकेत दिसणार नाहीत, असे कलाटणी देणारे प्रसंग इथे घडतात. अशीच एक कलाटणी या कार्यक्रमाच्या १६ व्या सीझनला मिळाली आहे. ती म्हणजे या भागात शेखर सुमनने एन्ट्री केली आहे.

आधी अशी माहिती होती की, कृष्णा अभिषेक या कार्यक्रमात येणार आहे. पण त्याऐवजी शेखर सुमनची वर्णी लागली आहे. अन्‌ या घरातील भल्याभल्यांचे मुखवटे तो उतरवणार आहे, अशी अटकळ बांधली जात आहे. खुद्द निर्मात्यांनीच या गोष्टीस दुजोरा दिला आहे. त्यांनी सुमनचा एक व्हिडिओ ट्वीटर करून हा उलगडा केलेला आहे. तो सगळ्यांचे मुखवटे काढणार आहे, असे त्यात दिसते.

या व्हिडिओमध्ये शेखरच्या हाती एक मुखवटा आहे. त्यात त्याने आपला चेहरा लपवला आहे. दर रविवारी शेखर सुमन बिग बॉसच्या घरात येऊन घरात राहणाऱ्यांचा असली चेहरा लोकांसमोर आणील.

पूर्वी शनिवार-रविवार हे वीक एन्डचे वार असत. आता हा वीक एन्ड शुक्रवार- शनिवार राहणार असून रविवारच्या संध्याकाळी शेखर सुमन प्रवेश करेल.

या कार्यक्रमाचा नवा प्रोमो निर्मात्यांनी ट्वीटर आणि इन्स्टाग्राम वर प्रदर्शित केला आहे.