बिग बॉस 16 महाअंतिम सोहळ्यापूर्वीच चमकले काही स...

बिग बॉस 16 महाअंतिम सोहळ्यापूर्वीच चमकले काही स्पर्धकांचे नशीब (Bigg Boss 16: Before Season Finale Many Lucky Contestants Bagged Big Projects And Films)

बिग बॉस हा भारतीय टीव्ही इंडस्ट्रीचा सर्वात मोठा आणि सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये जो कोणी भाग घेतो तो प्रत्येक घराघरात ओळखला जातो. यावेळी म्हणजेच बिग बॉस 16 मध्ये स्पर्धकाचे नशीब महाअंतिम फेरी आधीच उघडले आहे.

यावेळी अनेक स्पर्धकांना शो संपण्यापूर्वीच भरपूर काम मिळाले आहे. अनेक स्टार्सचे अनेक मोठे प्रोजेक्ट्स सुरू झाले आहेत आणि म्हणूनच हा शो प्रत्येकासाठी लकी ठरला.

अभिनेत्री टीना दत्ताबद्दल बोलले जात आहे की तिने दक्षिणेतील एक मोठा चित्रपट मिळवला आहे. तसेच ती दुर्गा आणि चारू या टीव्ही शोमध्येही दिसणार आहे.

टीनानंतर शालीन भानोतलाही एकता कपूरच्या ब्युटी अँड द बीस्टसाठी फायनल करण्यात आले आहे. यापूर्वी हा शो कुशल टंडन करणार होता.

अंकित गुप्ता आणि गौतम विज घरातून बाहेर आले असले तरी घराबाहेर एक मोठा शो त्यांची वाट पाहत होता. जुनूनियात या नवीन शोमध्ये दोघेही दिसणार आहेत.

निमृत कौर अहलुवालियालाही एकता कपूरने लव्ह, सेक्स और धोखा 2 साठी फायनल केले आहे. त्याचप्रमाणे,

एकता कपूरने शोमध्ये पाहुणे म्हणून भेट देताना सांगितले होते की ती या सीझनमधून नागिन 7 साठी एका अभिनेत्रीला कास्ट करणार आहे. त्यामुळे ती इमली फेम सुंबूलला ही भूमिका देईल असे म्हटले जात आहे.

त्याचप्रमाणे सौंदर्या शर्मा, शिव ठाकरे आणि इतरांनाही काम मिळाल्याच्या बातम्या आहेत. खतरों के खिलाडीमध्ये शिव दिसणार आहे, तर प्रियंका सलमान खानच्या चित्रपटात दिसू शकते.