बिग बॉस कार्यक्रमात सलमान खानने राखी सावंतला प्...

बिग बॉस कार्यक्रमात सलमान खानने राखी सावंतला प्रश्न केला – रितेश, हा खरंच तुझा नवरा आहे की भाड्याने आणलाय्? (Bigg Boss 15: Salman Khan Asks Rakhi Sawant, If Ritesh Is Really Her Husband Or She Hired Him?)

बिग बॉस १५ मध्ये पु्न्हा एकदा धमाकेदार ट्विस्ट आला आहे. बिग बॉसच्या घरात रश्मि आणि देवोलीनासोबतच राखी सावंतने वाइल्ड कार्डने प्रवेश केला आहे. यात गंमत अशी आहे की, राखीने एकटीने घरप्रवेश केला नसून तिच्यासोबत तिचा रहस्यमय पती रितेशही आला आहे. रितेशच्या येण्याने राखीचं लग्न म्हणजे प्रसिद्धीसाठीची थाप नसल्याचं समोर आलं आहे. कारण राखीनं जेव्हा अचानक लग्न केलं होतं त्यावेळेस तिच्या नवऱ्याचा चेहरा कोणीच पाहिलेला नव्हता.

मागच्या सीझनमध्येही राखीने रितेशचा बरेचदा उल्लेख केला होता आणि त्याला बिग बॉसमध्ये येण्याचा आग्रह केला होता पण तो आलाच नाही. त्यामुळे घरातील सदस्य आणि चाहत्यांना असे वाटले की, राखी हे सर्व केवळ मनोरंजनासाठी बोलते आहे. तिचे लग्नही खोटे आहे आणि तिला रितेश नावाचा नवरा वगैरे कोणी नाही. परंतु, रितेशच्या एंट्रीने सगळे चुकीचे आणि राखी बरोबर असल्याचे सिद्ध झाले. तरीही लोकांना याची खात्री पटत नसून बिग बॉसने राखीचा नवरा म्हणून कोणीतरी खोटा माणूस पाठवला आहे, असे त्यांना वाटत आहे.

यावेळी वीकेंड का वारमध्ये सलमान खानने राखी सावंतला प्रश्न केला – रितेश, हा खरंच तुझा नवरा आहे की भाड्याने आणलाय्‌? तेव्हा उत्तर देताना, नाही, नाही, रितेश तुझा मेहुणा आहे आणि माझा एकुलता एक पती परमेश्वर आहे, असे सलमानला म्हणाली.

यानंतर सलमानने रितेशला त्याच्या पार्श्वभूमीबद्दल देखील विचारले, ज्यावर रितेशने सांगितले की, तो सॉफ्टवेअर व्यवसायाशी संबंधित आहे. तो मूळचा बिहारचा आहे आणि सध्या तो बेल्जियममध्ये राहतो. रितेशने असेही सांगितले की, तो त्याचे लग्न स्वीकारण्यास घाबरत होता आणि त्यानेच राखीला आपली ओळख लपवण्यास सांगितले होते. रितेश म्हणाला की, मागच्या सीझनमध्ये जेव्हा तो राखीला उदास पाहायचा तेव्हा त्याला खूप वाईट वाटायचे.

पुढे, रितेशने राखीचे कौतुक केले आणि सात जन्म आपण तिची साथ देणार आहोत असे सांगितले. त्याने गुडघ्यावर बसून राखीला प्रपोजही केले. घराबाहेरही लोकांचा रितेशवर विश्वास नव्हता. त्यांनाही तो खोटाच वाटत होता आणि त्याला राखीने भाड्याने आणले असावे अशी चर्चा, लोक ट्विटरवर करत होते. त्यामुळेच सलमानने राखीला अशाप्रकारचा प्रश्न केला…