कडाक्याचे भांडण झाले, अन् रश्मि देसाईने देवोलिन...

कडाक्याचे भांडण झाले, अन् रश्मि देसाईने देवोलिनाच्या थोबाडीत मारली (Bigg Boss 15: Rashmi Desai Slaps Devoleena After Big Fight)

जसजसा बिग बॉस १५ शो फिनालेच्या टप्प्यापर्यंत पोहचत आहे, दर्शकांचा उत्साह अधिक वाढत आहे. त्यात या घरामध्ये नेहमी काही ना काही रोचक पाहायला मिळत असतं. अर्थात्‌ बिग बॉसच्या घरात काहीही होऊ शकतं. आता हेच बघा, रश्मि देसाई आणि देवोलिना या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या परंतु आता त्यांच्यात दरी निर्माण झाली आहे. रश्मिने तर देवोलिनाच्या थोबाडीत मारेपर्यंत मजल मारली.

होय. शोचा प्रोमो पाहिल्यानंतर समजलं की, फिनालेचं तिकिट मिळवण्याच्या स्पर्धेसाठी रश्मि आणि देवोलिनामध्ये अक्षरशः मारामारी झाली. खरंतर घरातील काही सदस्य व्हीआयपी झोन मध्ये आहेत. यात राखी सावंत, प्रतीक, शमिता, करण कुंद्रा अशी नावं आहेत आणि हीच मंडळी आता कोण या झोनमध्ये सामील होईल ते ठरवणार आहेत. परंतु रश्मि आणि देवोलिनाच्या बाबत घरवाल्यांचं एकमत होत नाहीये.

रश्मि आणि देवो दोघी राखीला त्यांच्या बाजूने निर्णय देण्यास सांगतात परंतु राखी दोघींना इतकी भडकवते की दोघांमध्ये भांडण होतं. रश्मि राखीला सांगते की, ती चुकीची वागत आहे. देवोलिनाइतकी खोटारडी कोणी नाही, ती लोकांचा वापर करते असा आरोपही ती देवोलिनावर लावते. रागाने लालबुंद झालेली रश्मि हे सर्व बोलता बोलताच देवोलिनाच्या थोबाडीत लगावते. रश्मिच्या अशा वागण्यामुळे आता बिग बॉस कोणता निर्णय घेतील हे हा शो प्रदर्शित होईल तेव्हाच कळेल. या दोघींपैकी कोणाला फिनालेचं तिकीट मिळेल अन्‌ कोण या शोच्या बाहेर जाईल हे लवकरच कळेल. पण तुम्हाला काय वाटतंय रश्मिच्या वर्तणुकीमुळे ती बाहेर जाईल?