बिग बॉस-१५ च्या घराची जंगल थीम सोशल मीडियावर हो...

बिग बॉस-१५ च्या घराची जंगल थीम सोशल मीडियावर होतेय व्हायरल! (Bigg Boss-15: FIRST PICS Of Jungle Themed House Go Viral)

प्रेक्षकांची ‘बिग बॉस 15’ ची प्रतीक्षा आज संपणार आहे. आज (2 ऑक्टोबर) संध्याकाळपासून प्रेक्षकांना दररोज मनोरंजनाचा पूर्ण डोस मिळणार आहे. सलमान खान १५ स्पर्धकांसह त्याच्या शोची सुरुवात करणार आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त म्हटला जाणारा ‘बिग बॉस -15’ शो काही तासांत सुरू होणार आहे. दरवेळी प्रमाणे या वेळीही ‘बिग बॉस -15’मध्ये काहीतरी वेगळे घडणार आहे, मग ती शोची थीम, संकल्पना किंवा स्पर्धकांना दिलेली टास्क असो किंवा त्यांचे एलिमिनेशन असो.

या वेळी बिग बॉझच्या घराचे डिझाईनही जरा हटकेच आहे. फिल्ममेकर ओमंग कुमार आणि त्यांची पत्नी वनिता ओमुंग कुमार यांनी जंगल या थीमवर घराचे डिझाईन केले आहे. त्यामुळे स्पर्धकांना जंगलात राहावे लागेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जंगल थीममुळे कदाचित स्पर्धकांना थोडाफार त्रास सहन करावा लागेलही, पण मजा जास्त घेता येणार आहे.

चाहतेही मजा, विनोद आणि मारामारी, भांडणे सर्व एकत्र पाहण्यासाठी आता खूप उत्सुक आहेत. आज रात्री ‘बिग बॉस 15’ चा भव्य प्रीमियर पार पडेल. दरवेळी प्रमाणे हा शो बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान होस्ट करताना दिसणार आहे.

पाहुया बिग बॉसच्या जंगलमय घराचे काही फोटो…