आई कुठे काय करते मध्ये अभिषेक-अनघाच्या लग्नाचा ...

आई कुठे काय करते मध्ये अभिषेक-अनघाच्या लग्नाचा थाटमाट (Big Fat Wedding Of Young Couple In ‘Aai Khthe kay Karate’)

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत देखील असतात. आता सध्या ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेत आता लगीनघाई सुरु असल्याचे दिसत आहे. बऱ्याच दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी संपूर्ण देशमुख कुटुंब उत्साहात असून खास संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय.

या संगीत सोहळ्यात देशमुख कुटुंबाने रेट्रो लूक धारण केलाय. अनिरुद्ध-संजना, अभिषेक-अनघा, माई-अप्पा, यश-गौरी आणि इशाने सदाबहार मराठी गाण्यांवर ठेका धरत संगीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत केली आहे. या संगीत सोहळ्यात आशुतोषही सामील झाला आहे. अरुंधती आणि आशुतोषमधील ही वाढती मैत्री अनिरुद्धला मात्र खटकते आहे. त्यामुळे एकीकडे आनंदाचं वातावरण असताना अनिरुद्ध मात्र अस्वस्थ आहे.