‘बिग बुल ‘ चा अभिनेता, अभिषेक बच्चन...

‘बिग बुल ‘ चा अभिनेता, अभिषेक बच्चनची लोकांना मास्क घालण्याची विनंती. (‘Big Bull’ Actor Abhishek Bachchan Urge Everyone To Wear Mask)

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. हाती आलेल्या बातमीनुसार कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या, गुरुवारी २ लाखांहून अधिक झाली आहे. हे आकडे पाहता अभिनेता अभिषेक बच्चनने आपले चाहते, प्रशंसक आणि मित्रांना सदैव मास्क घालण्याची विनंती केली आहे.

कोरोनाची साथ नियंत्रित करण्यासाठी सरकारने लोकांना नियमावलीचे पालन करण्यास सांगितले आहे. तशातच अभिषेकने मास्क घालून आपला एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिषेकने इंस्टाग्रामवर हि सेल्फी पोस्ट करून खणखणीत आवाजात, स्पष्ट शब्दात एक संदेश दिला आहे. आरोग्य राखण्याच्या हेतूने सर्व नियमावलींचे पालन करण्याची त्यात विनंती केली आहे. ‘बिग बुल’ च्या अभिनेत्याने ही सेल्फी लखनौ येथून पोस्ट केली आहे.

या सेल्फीमध्ये अभिषेकने सफेद शर्ट व मॅचिंग मफलर घातला आहे. तसेच निळा मास्क घालून, सनग्लासने आपले लूक पूर्ण केले आहे. तो लिहितो, ” पिल्ज, प्लिज, प्लिज … मास्क घाला. स्वतः साठी नाही तर आपले कुटुंबीय, वडीलधारी माणसे, मित्र आणि आपल्या प्रिय व्यक्तींचा विचार करा.” अभिषेकची हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून, त्याच्या चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॉलिवूडच्या इतर कलाकारांप्रमाणेच अभिषेक आणि ऐश्वर्या, आराध्या व अमिताभ कोरोनाच्या विळख्यात, गेल्या वर्षी सापडले होते.

काही दिवस हॉस्पिटलात काढल्यावर बरा होऊन अभिषेक घरी आला. स्वतः त्रास भोगल्याने तो लोकांना कोरोना बाबत जागरूक करून नियमांचे पालन करण्याची विनंती करीत आहे.