‘बिग बॉस’ची सांगता : त्या जागी येणा...

‘बिग बॉस’ची सांगता : त्या जागी येणार दोन नव्या मालिका (Big Boss Marathi To Conclude Tomorrow : Two New Serials Will Take Its Place)

‘बिग बॉस’ मराठी सीझन ३ (Big Boss Marathi) या कार्यक्रमाची सांगता सोमवारी होत आहे. १०० दिवसांचा बिग बॉसच्या घरातील सदस्यांचा प्रवास संपत आहे. अन्‌ विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शाह हे टॉप ५ सदस्य आता या घरात उरले असून त्यामधून महाविजेता कोण ठरणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हा औत्सुक्यपूर्ण भाग ग्रॅन्ड फिनाले उद्या सायंकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर दाखविण्यात येईल.

Big Boss Marathi

बिग बॉसची जागा भरून काढण्यासाठी कलर्स मराठीने २ नव्या मालिकांची घोषणा केली आहे. त्यापैकी ‘आई : मायेचं कवच’ ही मालिका सोमवार पासून रात्री १० वाजता, तर ‘तुझ्या रूपाचं चांदनं’ ही मालिका रात्री ९.३० वाजता सुरू होणार आहे.

Big Boss Marathi
Big Boss Marathi

या कार्यक्रमांविषयी बोलताना कार्यक्रम प्रमुख विराज राजे म्हणाले, ” ‘आई’ या मालिकेतून आम्ही पहिल्यांदाच सिंगल पॅरेंट आणि तिचा प्रवास या नाजुक विषयाला हात घातला आहे. तर ‘तुझ्या रूपाचं चांदनं’ या मालिकेत नक्षत्रा या सुंदर मुलीची कथा आहे. गरीब घरात सुंदर म्हणून जन्माला येणं शाप आहे, अशा समजुतीमध्ये तिचं बालपण गेलं आहे. बाह्यसौंदर्याला महत्त्व देणाऱ्या नक्षत्रासारख्या मुलीला आपल्या समाजात, त्यांच्या रूपावरून, शरीरयष्टीवरून हिणवलं जातं. त्यावर नक्षत्रा कशी मात करते, हे या मालिकेचं कथानक आहे. “

Big Boss Marathi

‘आई’ मालिकेतील शीर्षक भूमिका भार्गवी चिरमुले करत आहे. आपल्या भूमिकेबद्दल ती सांगते, ” या मालिकेत मी मीनाक्षी कुंटे या आईची भूमिका करते आहे. मीनाक्षीचं तिच्या मुलीवर जिवापाड प्रेम आहे. आईला आपण देवासारखं मानतो. पण ती देखील माणूसच आहे. तिच्या हातून चुका झाल्या तरी त्याची झळ ती मुलांपर्यंत पोहचू देत नाही. अशी ही संघर्ष करणारी व्यक्तीरेखा आहे.”

‘आई’ चे निर्माते महेश कोठारे आहेत. तर ‘तुझ्या रूपाचं चांदनं’ चे निर्माते कैलाश अधिकार आहेत.