‘बिग बॉस’ फेम आविष्कार दारव्हेकरच्य...

‘बिग बॉस’ फेम आविष्कार दारव्हेकरच्या अडचणी वाढल्या : त्याच्या दुसऱ्या बायकोने तिसऱ्या लग्नावर घेतला आक्षेप, शिवाय हिंसाचाराचे आरोप (‘Big Boss’ Fame Avishkar Darvekar In Big Trouble : His Second Wife Raise Objection For 3 Rd Marriage )

बिग बॉस फेम अविष्कार दारव्हेकर पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकला आहे. गेले काही वर्षे तो मराठी सिने सृष्टीपासून दूर होता. मध्यंतरी तो अभिनेत्री स्नेहा वाघसोबत झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत होता. त्यानंतर ते दोघे बिग बॉसमध्ये समोरा समोर आले पण तेव्हा त्यांनी एकमेकांपासून दूर राहणेच पसंत केले.

आता पुन्हा एकदा अविष्कारने लग्न केल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. अविष्कारने सोशल मीडियावर एका महिलेसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोत अविष्कारने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. या फोटोबाबत अविष्कारला अनेक युजर्सने प्रश्न विचारले आहेत.

पण अशातच आता अविष्कार बाबत नवे प्रकरण समोर आले आहे. त्यात अविष्कारच्या दुसऱ्या लग्नाच्या पत्नीने त्याच्यावर हिंसाचार आणि फसवणूकीचे आरोप केले आहेत.  अविष्कारच्या या तिसऱ्या लग्नावरुन त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या पत्नीने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. अविष्कारच्या दुसऱ्या पत्नीचे नाव स्मिता सावंत असल्याचे समोर आले आहे. स्मिताने अविष्कारचे तिसरे लग्न बेकायदेशीर असल्याचा दावा तिने फेसबुक माध्यमातून केला आहे. त्यामुळे अविष्कारचे हे आणखी एक लग्न जगासमोर आले आहे.

स्मिताने सांगितले की, लग्नानंतर दारू पिऊन रोज मारायचा रात्रभर घराबाहेर बसवून ठेवायचा घाणेरडे आरोप करायचा, माझ्या गरोदरपणावेळी मला खूप मारायचा, रात्रभर जमिनीवर बसवून ठेवायचा, माझ्या 7 व्या महिन्यामध्ये घरात संपूर्ण तेल पाणी ओतून ठेवलं. डाळ तांदूळ फेकून दिले आणि मला ते सगळं साफ करायला लावलं त्यात मी पडले तरी त्याने बघितलं पण नाही. बनवलेले जेवण फेकून द्यायचा आणि रात्री २-३ वाजता परत बनवायला लावायचा. हातात जे मिळेल त्याने मारायचा, चालत्या कारमधून ढकलून देत होता. त्याच्या न होणाऱ्या कामाचं, अपयाशाचं खापर त्याने माझ्या माथी मारलं. त्याच्या मते मी त्याला काम मिळवून द्यायला हवं होत. मी दिग्दर्शक, निर्मात्यांशी बोलायला हवं होत.

अशा बऱ्याच घटना आहेत की त्याने मला मानसिक, शारीरिक त्रास दिला आहे. याच्या बाकी फॅमिलीला सुद्धा माहित होत की यांनी असे लग्न केलं आहे. पण तरीही कोणी मला सांगितलं नाही की कळू दिलं नाही. यांच्या स्वतःच्या बहिणी सोबत असे झालं असतं तरी हे असेच षंडासारखे गप्प राहिले असते का? स्वतःला उच्च शिक्षित, सुसंस्कृत म्हणवणारी ही दारव्हेकर फॅमिली अतिशय खालच्या पातळीची, नीच निघाली. याच्या वडिलांनीही हेच केलं. लग्नाची बायको असताना दुसरी बाई आणून ठेवली दुसरं घर केलं याच्या आईने तरीही संसार केला.

ज्या बाई सोबत हे घडलं आहे ती बाई स्वतःच्या सुनेसोबत, जिच्या पदरात एवढा लहान मुलगा आहे तिच्या सोबत हे कसे काय होऊ देऊ शकते. तीच स्वतःच्या मुलाचं असे बेकायदेशीर लग्न कसे काय लावून देऊ शकते. किती असवेंदनशील आहे हे स्त्री जातीला काळिमा आहे ही बाई..’

मला तो सतत हेच सांगत राहिला की माझ्या कामाचं झालं की मी येईन पण दुसरीकडे तर त्याने या मुलीशी अनैतिक संबंध ठेवले आणि त्यानंतर गुपचूप लग्न केलं त्याने बिग बॉस मधेही माझा आणि आमच्या मुलाचा कुठेही उल्लेख केला नाही. माझा वा माझ्या मुलाचा कोणताही खर्च हा देत नाही. आमच्या हक्काचे पैसे हा त्या मुलीवर उडवतो आहे. कायदेशीर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून लिव्हिंग रेलेशनशिपचं प्रमाणपत्र काढलं आहे.

माझे आई वडील अतिशय साधे, सर्वसामान्य माणसं आहेत. मला कोणी भाऊ बहीण नाही कोणाचाही पाठिंबा नाही त्याचाच फायदा या लोकांनी घेतला आणि आम्हाला फसवलं. मला तो हेच सांगतो की मी 2 किंवा  5 लग्न जरी केली तरी तू माझं काहीच बिघडवू शकत नाहीस कोणी माझ्या अंगाला हात पण लावू शकत नाही. त्याने त्याच्या पहिल्या लग्ना बद्दल ही मला खोटच सांगितलं होत.”आतापर्यंत स्नेहा वाघ हीच अविष्कारची पत्नी असल्याचे माहित होते पण आता अचानक अविष्कारची तीन लग्नं झाल्याचे समजताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.