बिग बॉसच्या घरात दिवाळी : पण आनंदाच्या प्रसंगी ...
बिग बॉसच्या घरात दिवाळी : पण आनंदाच्या प्रसंगी नॉमिनेट होण्याचे संकट (Big Boss Celebrating Diwali With Nomination)

By Deepak Khedekar in मालिका दर्शन
बिग बॉसचे घर, आज दिवाळीच्या निमित्ताने सजले आहे. आकाश कंदिल, तोरण, दिव्यांच्या माळा लागल्या आहेत. मात्र या आनंदाच्या प्रसंगी आज नॉमिनेट होण्याचं संकट येणार आहे.


नॉमिनेशनची प्रक्रिया मात्र नाविन्यपूर्ण असणार आहे. या घरात जे तोरण लावलं आहे, त्यावर घरातील सदस्यांचे फोटो आहेत. हे तोरण आज उघड होणार आहे.

बिग बॉस म्हणतात, “ज्या सदस्यांचे फोटो या तोरणावर नसतील ते सदस्य नॉमिनेट होतील…”

तेव्हा आज हे नॉमिनेशन कार्य रंगणार यात शंका नाही.