कंगणा रणौतच्या ‘लॉक अप २’ मध्ये बिग बॉस १६च्या ...

कंगणा रणौतच्या ‘लॉक अप २’ मध्ये बिग बॉस १६च्या घरातील सदस्यांची वर्णी लागणार (Big Boss 16’s Members Approached For Ekta Kapoor Kangana Ranaut Lock Upp 2 )

एकीकडे टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस’चा १६ वा सीझन संपला आणि दुसरीकडे कंगना रणौत होस्ट करत असलेल्या ‘लॉक अप’ शोच्या दुसऱ्या सीझनची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. पहिला सीझन सुपरहिट झाल्यानंतर आता कंगना रणौत दुसऱ्या सीझनची तयारी करत असल्याचं बोललं जात असून या शोसाठी बिग बॉस १६ मधील काही स्पर्धकांची नावं चर्चेत आली आहेत.

कंगना रणौत होस्ट करत असलेल्या ‘लॉक अप’ शोला मागच्या वर्षी खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या शोचा दुसरा सीझन लवकरच येणार असल्याच्या चर्चा असून त्यात बिग बॉस १६ मधील रनरअप शिव ठाकरे, प्रियांका चौधरी, अर्चना गौतम यांच्यासह इतर काही प्रसिद्ध स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.

बिग बॉस १६ मध्ये शिव ठाकरेने त्याची दमदार खेळी आणि चांगल्या वागणूकीने सर्वांची मनं जिंकली होती. त्यानंतर शिव ठाकरेला रोहित शेट्टीचा रिअलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ची ऑफर मिळाल्याचं बोललं जात आहे. पण त्याच बरोबर कंगनाच्या ‘लॉक अप’ शोसाठीही त्याला विचारणा झाल्याची चर्चा होताना दिसत आहे.

दरम्यान ‘लॉक अप’ शोसाठी शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्या व्यतिरिक्त सौंदर्या शर्माचं नावही चर्चेत आहे. बिग बॉस १६ चे हे तीनही सदस्य कंगना रणौत होस्ट करत असलेल्या शोमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. यावेळी हा शो फक्त ओटीटीवर नाही तर टीव्हीवरही टेलिकास्ट होणार असल्याचं बोललं जात आहे. शिव ठाकरेचं नाव समोर आल्यापासून या शोबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचं दिसत आहे.

या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना पहिल्यांदाच शो होस्ट करताना दिसली होती.’लॉक अप 2’ची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. यावेळी शोमध्ये बरेच काही बदललेले पाहायला मिळणार आहे. लॉक अप 2 हा मागील सीझनपेक्षा खूप लांब असणार आहे. जिथे पहिला सीझन ७२ दिवसांचा होता. तर दुसरा सीझन ९० दिवस चालणार असल्याचे समजते. याशिवाय शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये आणखी एक बदल करण्यात आला आहे. यावेळी लॉक अप सीझन OTT वर दाखवला जाणार नाही तर टीव्हीवर दाखवला जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

आता कंगनाच्या शोसाठी अप्रोच झालेल्या स्पर्धकांमध्ये सोशल मीडिया सेन्सेशन फैजल शेखचे नाव अर्थात मिस्टर फैजू याचीही वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. फैजल हे रिअॅलिटी शोजच्या जगात नवीन नाव नाही. यापूर्वी तो खतरों के खिलाडी 12 मध्ये दिसला होता. या शोसाठी फैजलशी संपर्क साधण्यात आला आहे, परंतु त्याने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.