अभिनेत्रीसोबतच वकीलसुद्धा आहे बिग बॉस 16ची स्पर...

अभिनेत्रीसोबतच वकीलसुद्धा आहे बिग बॉस 16ची स्पर्धक निम्रत कौर अहलूवालिया (Big Boss 16 Contestant Nimrat Kaur Ahluwalia Is Not Only An Actress But Also A Lawyer, She Has Made These Revelation)

बिग बॉस 16 ची तिसरी स्पर्धक म्हणून अभिनेत्री निम्रत कौर अहलुवालियाचे नाव निश्चित झाले आहे. निम्रतने ‘छोटी सरदारनी’ या मालिकेत मेहर कौर ढिल्लॉनची भूमिका साकारली होती. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून याबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र प्रोमोवरून तरी ती स्पर्धक निम्रत कौर अहलुवालिया असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तसेच अभिनेत्रीची निर्मात्यांशी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात होते.


अभिनेत्री होण्यापूर्वी निम्रत मॉडेलिंग करायची. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. निम्रत कौरने 2018 च्या फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत देखील भाग घेतला होता, त्यामध्ये ती टॉप 12 मध्ये निवडली गेली होती.
‘छोटी सरदारनी’ या मालिकेशिवाय निम्रतने ‘नती पिंकी की लव्ह स्टोरी’मध्येही काम केले आहे. तर काही मालिकांमध्ये पाहुणी कलाकर म्हणून काम केले. इतकंच नाही तर ती ‘खतरा खतरा’ सारख्या रिअॅलिटी शो आणि काही म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. निम्रत कौरचे शालेय शिक्षण दिल्लीतून झाले, पुढे तिने कायद्याचे शिक्षण मोहालीतून घेतले.


निम्रत कौरचे वडील सैन्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर तिची आई शिक्षणतज्ज्ञ आहे. अभ्यास आणि मॉडेलिंगसोबतच निम्रत कौरचा थिएटरशीही संबंध आहे. निम्रतला एक भाऊ असून तो सध्या अमेरिकेत शिकत आहे.


निम्रत जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होती तेव्हा तिचे वजन खूप जास्त होते, त्यामुळे लोक तिची चेष्टा करायचे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले होते की, “जेव्हा मी 12वीत होते, तेव्हा मला सतत खाण्याची सवय लागली होती. अभ्यास आणि बोर्डाच्या परीक्षांमुळे माझ्यावर खूप दडपण आलं होतं. सतत खाल्यामुळे माझे वजन 78 किलो झाले होते. जेव्हा मी लॉ कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला होते तेव्हा माझ्या बॅचच्या आणि हॉस्टेलच्या मुली माझी चेष्टा करायच्या.”


मानसिक त्रासामुळे निम्रत नेहमीच हैराण असायची. 2021 मध्ये तिने या कारणासाठी टीव्ही शोमधून 40 दिवसांचा ब्रेक घेतला होता. त्यावेळी निम्रतचा ब्रेन बर्नआउट झाला होता. अशा परिस्थितीत पीडित व्यक्ती शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या थकून जाते. मर्यादेपलीकडे वाढलेल्या तणावामुळे त्याला फारसे काम करता येत नाही.


मध्यंतरी निम्रतने खुलासा केला की शहनाज गिलच्या आधी मला ‘हौसला रख’ चित्रपट ऑफर करण्यात आला होता. पण नंतर मला रिप्लेस करण्यात आले. अभिनेत्री म्हणाली होती, “मला ‘छोटी सरदारनी’ या टीव्ही मालिकेदरम्यान ‘हौसला राख’ची ऑफर आली होती.दिलजीत (दोझांस) सरांनी आधी माझ्याशी संपर्क साधला होता. त्या भूमिकेची ऑडिशन देण्यासाठी मला सरांनी इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता. त्यांचा तो मेसेज पाहून त्याक्षणी मला रडायला आले. पण नंतर मला समजले की ती भूमिका शहनाज गिल करत आहे.निम्रत कौरला अनेक चित्रपटांमधून रिप्लेस करण्यात आले आहे. एकदा कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी तिला दिल्लीहून मुंबईला बोलावले होते. एका मुलाखतीदरम्यान निम्रतने सांगितले होते की, ते एका चित्रपटासाठी कास्टिंग करत होते, तो चित्रपट एक नवीन दिग्दर्शक बनवणार होता. मी दिल्लीहूनच माझ्या ऑडिशन टेप्स पाठवल्या होत्या आणि बाकीच्या राउंडसाठी मुंबईला आले. तिथे मी निर्माता आणि दिग्दर्शकांना भेटले. त्यांनी मला कॉन्ट्रॅक्ट आणि पेपर वर्क बद्दल सांगून काही दिवस थांबायला सांगितले.

पण नंतर त्यांनी मला कधीच फोन केला नाही. मी वाट पाहत राहिले. नंतर हा चित्रपट स्टार किड्सना देण्यात आल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते. त्यादरम्यान तिला ‘छोटी सरदारनी’ची ऑफर आली आणि ती टीव्हीसाठी काम करु लागली. तिला करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटाची ऑफर आल्याचे तिने सांगितले होते. चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनी तिला थांबण्यास सांगितले होते.