राखी सावंतला रस्त्यावर टाकले… (Big Boss 1...

राखी सावंतला रस्त्यावर टाकले… (Big Boss 14: Rakhi Sawant Reveals She Was Molested In A Car)

आत्तापर्यंत आपल्या करामतींनी लोकांचं मनोरंजन करणाऱ्या राखी सावंतला बिग बॉस १४ मध्ये धाय मोकलून रडताना पाहिलं गेलं. स्टॉक मार्केट टास्क दरम्यान राहुल वैद्यसमोर आपल्या खाजगी जीवनातील काही गोष्टी शेअर करताना राखीला अश्रू अनावर झाले.

राखी ने सांगितले की, ती लहान असताना तिच्या आईला ॲटॅक आला होता आणि आईला हॉस्पिटलमध्ये नेले होते. आईच्या उपचारांसाठी लागणारे पैसे ऐकून मी घाबरली. तेव्हा माझ्या मित्राने सांगितले की, मी तुला पैसे देईन. मी तुझे पैसे नंतर परत करेन असे सांगितल्यानंतर त्याने, त्याची काही गरज नाही. तुझ्या आईची तब्येत आणि आपली मैत्री माझ्यासाठी महत्त्वाची आहे असे सांगितले. आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्यास भेटण्यास गेले तेव्हा नशेत असलेल्या त्याने माझ्याकडे गिव ॲन्ड टेकची मागणी केली. लॉक्ड कारमध्ये त्याने माझा विनयभंग करून मला रस्त्यावर टाकले, असं सांगत असतानाच राखी रडायला लागली. तिचं रडणं बघून राहुलही भावूक झाला आणि तू तेव्हा त्याच्याविरुद्ध तक्रार का नाही केली? असं त्यानं विचारलं. माझ्याकडे त्याच्या विरुद्ध काहीही पुरावा नव्हता असं राखीने त्याला सांगितलं.

राखीने आपला बॉयफ्रेंड अभिषेकबद्लही काही गोष्टी सांगितल्या. अभिषेकने आपल्याला अनेकदा चीट केले असल्याचे ती म्हणाली. तसेच कुटुंबातील व्यक्तींमुळे दोघांना वेगळं व्हावं लागलं होतं, असंही ती म्हणाली. आपला पती रितेश हा आधीच विवाहीत असून त्याला एक मूल आहे आणि मला मूल नाही. मी किती दुःख सोसू? असं बोलताना राखीला पुन्हा रडू आलं.

राहुलने तिला तुम्ही वेगळे का होत नाही? असं विचारल्यानंतर राखीने सांगितले, मी घटस्फोट घ्यायला घाबरते, कारण मी पूर्णतः संपलेली आहे. आत्ता एकटीने राहण्याची आणि एकटीने काहीही करण्याची माझ्यात हिंमत राहिलेली नाही.

राखीच्या बोलण्याने राहुल हळवा झाला होता. बिग बॉसने मग राहुल आणि राखीला कन्फेशन रुममध्ये बोलवून कारमधील विनयभंगाची गोष्ट पुन्हा येथे काढायची नाही असे सांगितले.

राखीने देवोलीनाला देखील रितेश विवाहित असल्याचे सांगितले होते आणि आपला विवाह कायदेशीर नाही असंही ती म्हणाली होती. तेव्हा देवोनेही तिला घटस्फोट घेण्याचाच सल्ला दिला होता. परंतु भविष्यात मी माझ्या मुलांना त्यांच्या वडिलांचे नाव देऊ इच्छीते त्यामुळे मला घटस्फोट घ्यायचा नाही, असे राखीने तिला सांगितले.

काही खाजगी कारणास्तव राखी आपल्या पती रितेशसोबत राहू शकत नाही. परंतु ती म्हणते की तिने आपले बीज फ्रोजन करून ठेवले आहेत आणि आपल्या ह्या मुलांना वडिलांचे नाव द्यावे, अशी ती रितेशला विनवणी करणार आहे.

राखीच्या या गोष्टींवर निक्की आणि रुबीना यांना विश्वास ठेवावासा वाटत नाही. शोमध्ये टिकून राहण्यासाठी आणि कंटेंट क्रिएट करण्यासाठी राखी अशाप्रकारच्या फेक स्टोरीज बनवते, तिच्या या गोष्टी खोट्या असतात, असे रुबीनाचे मत आहे.

रूबीनाचं राखीबद्दलचं मत वाचून सोशल मीडियावर अनेकांनी रुबीनाला बरोबर ठरवलं आहे, तर काहींनी तिला विरोध दर्शवत राखीची बाजूही घेतलेली दिसते.