बीगबी, शाहरुख खान ते कतरिना या कलाकारांनी गिनीज...

बीगबी, शाहरुख खान ते कतरिना या कलाकारांनी गिनीज बुकमध्ये स्थान मिळवले आहे. (Big B To Shahrukh And Katrina : These Bollywood Stars Hold Guiness Book Of World Records)

बॉलिवूडमधील काही कलाकारांनी असे काही विक्रम केले आहेत की त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन

बिगबी हे असे अभिनेता आहेत, ज्यांनी १३ गायकांसह हनुमान चालिसा गायलं आहे. हा एक जागतिक विक्रम असल्याने त्यांची दखल गिनीज बुकने घेतली. या हनुमान चालिसाला शेखर राव जियानी यांनी संगीतबद्ध केलं आहे.

अभिषेक बच्चन

१२ तासांमध्ये सर्वाधिक कार्यक्रमात भाग घेतल्याचा विक्रम अभिषेकच्या नावे नोंदण्यात आला आहे. ‘दिल्ली ६’ या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना अभिषेकने १२ तासात ७ शहरांमध्ये दर्शन दिले होते. आपले खासगी विमान आणि मोटारकार यामधून त्याने १८०० किलोमिटर अंतर कापले होते.
शाहरुख खान

२०१३ साली शाहरुख खान सर्वात जास्त पैसे कमावणारा नट ठरला. या वर्षात त्याने २२०.५ कोटी रुपये कमावले म्हणून त्याचे नाव गिनीज बुकात दाखल झाले.

कतरिना कैफ

याच वर्षी सर्वात जास्त पैसे कमावणारी अभिनेत्री म्हणून कतरिनाने या विक्रम बुकमध्ये स्थान मिळविले. तिने या एका वर्षात ६३. ७३ कोटी रुपयांची कमाई केली होती.
आशा भोसले

आशाताईंनी २० पेक्षा जास्त भाषांमध्ये ११ हजारांहून अधिक गाणी गाऊन जागतिक विक्रम केला. अन गिनीज बुकात मानाचे नाव मिळविले.

कुमार शानू

९० च्या दशकात सर्वात जास्त यशस्वी आणि लोकप्रिय गायक म्हणून कुमार शानूचा गाजावाजा झाला होता. त्याने १९९३ साली एका दिवसात २८ गाणी ध्वनिमुद्रीत करण्याचा अफलातून विक्रम केला. हा जागतिक विक्रम ठरल्याने गिनीज बुकाने त्याची नोंद घेतली.
ललिता पवार

सतत ७० वर्षे रुपेरी पडद्यावर काम करणाऱ्या ललिताबाई पवार या जगातील एकमेव अभिनेत्री ठरल्या. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. अन ७० वर्षाच्या कारकिर्दीत ७०० हून अधिक चित्रपटातून कामे केली. त्यांच्या या विक्रमाची गिनीज बुकाने  नोंद घेतली.
बाहुबली

‘बाहुबली’ या चित्रपटाने विक्रमी यश मिळवलं. त्याच्या या प्रचंड यशामुळे ५० ह्जार चौरस फूट क्षेत्रफळाचे भव्य पोस्टर बनविण्यात आलं. सिनेसृष्टीच्या इतिहासातील हे सर्वात मोठं पोस्टर ठरलं. अन गिनीज बुक्समध्ये स्थान मिळवून बसलं.