बिग बी अमिताभ बच्चन यांनी केली ‘नच पंजाबन’ गाण्...

बिग बी अमिताभ बच्चन यांनी केली ‘नच पंजाबन’ गाण्याची नक्कल ( Big B Amitabh Bachchan’s Dance On The Steps Of ‘Nach Punjaban’)

एके काळाचे सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची आजही बॉलिवूडवर जादू कायम आहे. त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वासाठी आणि अभिनयासाठी ते ओळखले जातात.  वयाच्या या टप्प्यातही अमिताभ यांच्या फिटनेस आणि एनर्जीसोबत कोणतेच तरुण अभिनेते स्पर्धा करू शकत नाहीत. चित्रपटांसोबतच बिग बी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. ते सतत चाहत्यांसोबत त्यांचे फोटो आणि विचार शेअर करत असतो. अमिताभ यांनी नुकताच सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे.

जवळपास प्रत्येक ट्रेंड फॉलो करणारे बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये अभिनेता ‘जुग जुग जिओ’ चित्रपटातील नच पंजाबन या गाण्याची हूक स्टेपची नक्कल करताना दिसत आहे. बिग बींचा हा अनोखा अंदाज पाहून चाहत्यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.

 सध्या  जुग जुग जिओ या आगामी चित्रपटातील ‘नच पंजाबन’ या गाण्याची हुक स्टेप करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर आहे.  अमिताभ यांच्या आधी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या गाण्याचे व्हिडिओ बनवले आहेत.  अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या खास अंदाजात हा ट्रेंड आणखी खास बनवला आहे, त्यांचा हा फोटो इंटरनेटवर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या गाण्यावर डान्स करुन त्याचा व्हिडिओ बनवण्याऐवजी बिग बींनी ‘नच पंजाबन’ या गाण्याची हुक स्टेप करतानाचा फोटो काढला आणि तो शेअर केला आहे. हुक स्टेप देतानाचा अमिताभ यांचा फोटोमधील स्वॅग पाहण्यासारखा आहे, जो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडतो. फोटोमध्ये अमिताभ बच्चन खूपच स्टायलिश दिसत आहेत.  हेडबँड आणि चष्म्यासह जांभळ्या रंगाचा ट्रॅकसूट त्यांना खूप छान दिसत आहे.

हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये – नच पंजाबन, नच पंजाबन, नच पंजाबन असे त्या गाण्याचे बोल लिहिले आहे. बिग बींच्या या फोटोवर कमेंट करताना अभिनेता मनीष पॉलने, लव्ह यू सर असे लिहिले, ,त्यांचे चाहते देखील त्यांचा स्टाइलवर फिदा आहेत. 

त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अमिताभ लवकरच अयान मुखर्जीच्या “ब्रह्मास्त्र” चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बिग बीं सोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.