दिवाळीत दुर्घटना: महानायक अमिताभ बच्चन यांना अप...

दिवाळीत दुर्घटना: महानायक अमिताभ बच्चन यांना अपघात; हॉस्पिटलात दाखल(Big B Amitabh Bachchan Meets An Accident : Admitted In Hospital)

बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा दिवाळीच्या आदल्याच दिवशी अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या पायाची नस कापली गेल्यामुळे त्यांना तातडीने रुण्यालयात नेले आहे.

आज कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर बिग बींचा अपघात झाला. पायाची नस कापली गेल्यामुळे रक्तस्त्रावही खूप झाला. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्यांच्या पायाला टाके घालण्यात आले आहेत. सोबतच डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

या संदर्भातील माहिती बिग बींनी स्वत: आपल्या ब्लॉगमधून दिली. त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले की, केबीसीचे शूटिंग चालू असताना पायात एक बूट घातला होता. त्यामध्ये एक धातूचा तुकडा होता. त्यामुळे पायाची नस कापली गेली आहे. नस कापल्यामुळे पायातून रक्तही खूप गेले.

मला काही कर्मचारी आणि डॉक्टरांच्या टीमने रुग्णालयात नेले. काही टाके पडले असले तरी वेळेत उपचार मिळाल्याने मी बरा झालो. पण पायाला इजा झाल्यामुळे डॉक्टरांनी मला काही दिवस ट्रेडमिलवर न चालण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच त्यांनी मला उभे राहण्यास आणि जास्त हालचाल करण्यास मनाई केली आहे.