भूमी पेडणेकरचा अवतार पाहून नेटकरी म्हणाले, ही त...

भूमी पेडणेकरचा अवतार पाहून नेटकरी म्हणाले, ही तर उर्फी जावेदची स्टाईल (Bhumi Pednekar Got Trolled For Her Strange Dress: Users Compared Her With Urfi Javed)

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आपल्या स्पष्टवक्तेमुळे इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते. एखादी गोष्ट पटली नाही तर ती त्यावर आपले परखड मत मांडते. तसेच भूमी सोशल मीडियावर सुध्दा खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिथे आपले सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या लूकचे चाहते नेहमीच कौतुक करतात.

मात्र यावेळी भूमीला आपल्या लूकमुळे ट्रॉलिंगला सामोरे जावे लागले. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूरने दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींना आमंत्रण होते.

भूमीने सुध्दा सोनमच्या पार्टीला उपस्थिती लावली होती. पण त्यावेळी तिने जे कपडे परिधान केले होते ते पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला. भूमीला पाहून काहींनी ही तर उर्फी जावेदची स्टाईल असे म्हणाले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत भूमीने पांढऱ्या रंगाचा डीप नेक ड्रेस घातला आहे.

तिने इंडो वेस्टर्न स्टाईल करण्याचा प्रयत्न केला असला तरी लोकांना मात्र ती समजलेली नाही. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एकाने लिहिले की, ही तर उर्फी जावेदची स्टाईल तर आणखी एकाने लिहिली की उर्फीने बॉलिवूड मध्ये विचित्र कपड्यांची स्टाईल आणली आणि आता सर्वजण तिचे अनुकरण करत आहे.