भारती सिंगचे हे स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही, या...

भारती सिंगचे हे स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही, याचा तिला होतोय पश्चाताप (Bharti Singh’s Biggest Dream Remained Unfulfilled, Which She Will Always Regret)

देशातील आघाडीची विनोदी कलाकार भारती सिंगकडे आजच्या काळात संपत्ती आणि प्रसिद्धी सर्वकाही आहे. भारतीने मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले आहे. पण आजही तिला तिचे मोठे स्वप्न पूर्ण न झाल्याचा पश्चाताप होतो.

भारती सिंग केवळ एक उत्तम विनोदी कलाकार नाही तर ती एक उत्तम सूत्रसंचालक देखील आहे. पण भारती सिंगला एकेकाळी रायफल शूटर व्हायचे होते.

भारतीने आपल्या आयुष्यात खूप संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली आहे. पण इच्छा असूनही ती रायफल शूटिंगमध्ये करीअर करू शकली नाही. तिला ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हायचे होते. पण तेही शक्य झाले नाही याची खंत तिला अजूनही आहे.

भारती सिंगने एकदा सांगितले होते की, जर ती कॉमेडियन नसती तर ती नक्कीच रायफल शूटर झाली असती.जेव्हा तिने रायफल शूटिंगसाठी लागणाऱ्या कपडे आणि उपकरणांची चौकशी केली तेव्हा त्यासाठी 10 लाख रुपये खर्च येणार असल्याचे तिला समजले. तो खर्च त्या काळात तिच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. हा खर्च जेव्हा तिने तिच्या आईला सांगितला तेव्हा त्यांना सुद्धा मोठा धक्का बसला. भारतीने सांगितले की, त्याकाळात तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते.

भारतीने पुढे सांगितले की, तेव्हा माझ्या आईला तीन मुली होत्या. त्यांची लग्न तिला करायची होती. पैशांच्या अडचणीमुळे भारतीला आपल्या रायफल शूटिंगच्या स्वप्नांवर पाणी फिरवावे लागले. त्यावेळी तिच्याकडे पैसे नव्हते. आणि आज तिच्याकडे बक्कळ पैसे आहेत पण वेळ निघून गेली आहे.

आजच्या काळात भारती सिंग महिन्याला करोडो रुपये कमावते आणि अलिशान आयुष्य जगते. तिचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहेत. भारतीचे स्वप्न जरी अपुरे राहिले असले तरी ती आजच्या काळात एक यशस्वी विनोदी कलाकार आणि सूत्रसंचालक आहे.