एअरपोर्टवर भारती सिंगने पापाराझींना दिली धमकी, ...

एअरपोर्टवर भारती सिंगने पापाराझींना दिली धमकी, म्हणाली माझा मुलगा आता तुमचा बदला घेणार(Bharti Singh Threatened The Paparazzi At The Airport! Said- ‘My Son Will Now Take Revenge On You)

प्रसिद्ध कॉमेडियन आणि सूत्रसंचालक भारती सिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कॉमेडियन पापाराझींना माझा मुलगा गोला उर्फ ​​लक्ष्य मोठा होऊन तुमच्या सर्वांचा बदला घेईल असे सांगत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये भारती सिंह आणि लक्ष्य व्यतिरिक्त भारतीचा पती हर्ष देखील दिसत आहे. भारती सिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध कॉमेडियनच्या जबरदस्त कॉमिक टायमिंगला तोड नाही हे आपण सर्वजण जाणतो. तिची प्रत्येक छोटी गोष्ट प्रेक्षकांची मने जिंकते. हेच कारण आहे की भारती सिंग जिथे जाते तिथे पापाराझी तिला शोधतात आणि आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात.
नुकतीच भारती सिंग आपला मुलगा लक्ष्य आणि पती हर्षसोबत विमानतळावर जात होती. तेव्हा भारती सिंगला पाहताच पापाराझींनी तिला घेरले आणि तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. यादरम्यान, कॉमेडियनने पापाराझींना म्हणाली की, माझा मुलगा मोठा झाल्यावर तो सर्वांचा बदला घेईल.


3 एप्रिल 2022 ला कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी बाळाचे आगमन झाले. या दाम्पत्याने आपल्या मुलाचे नाव गोला उर्फ ​​लक्ष्य ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी भारती आणि हर्षने आपल्या मुलाचा चेहरा जगाला दाखवला होता. अनेकदा ती तिच्या मुलासोबत सर्वत्र स्पॉट झाली आहे.
काल म्हणजेच शुक्रवारी पापाराझींच्या सोशल मीडिया अकाउंटवरून भारती, लक्ष्य आणि हर्ष यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये भारती सिंग मुलाला कुशीत घेऊन जात असून, हर्ष लिंबाचिया तिच्या पाठी चालत आहे. व्हिडिओमध्ये, भारती आपल्या मुलाची पापाराझींशी ओळख करून देते.

मग एक पापाराझी पाहून म्हणते की- हा छोटू आहे. गोलू जेव्हा मी गरोदर होते ना तेव्हा हा मला घाबरवण्यासाठी स्कूटरवर पाठीमागून यायचा. मग ती पापाराझीला म्हणते, ‘आता माझा मुलगा तुझा बदला घेईल. तो तुमच्या मागे बाईक घेऊन येईल. हे ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक जोरजोरात हसू लागतात.
त्यानंतर तिथे उपस्थित कॅमेरामनने हर्षला बाबा झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यानंतर भारती आपल्या मुलाला म्हणते की हे सगळे तुझे मामा आहेत म्हणून तु यांना मामा म्हणूनच हाक मार.