जन्माष्टमीच्या निमित्ताने भारती आणि हर्षनं गोलू...

जन्माष्टमीच्या निमित्ताने भारती आणि हर्षनं गोलूला बनवलं बाळ गोपाळ, क्यूट लड्डू गोपालला लाखोंची पसंती (Bharti Singh Shared A Video Of Her Son Laksh In Krishna Costume on Janmashtami)

मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाने सोशल मीडिया वर जन्माष्टमीचे निमित्त साधून आपला मुलगा लक्ष्यचा अतिशय गोड असा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांचा ३ महिन्यांचा मुलगा लक्ष्य लड्डू गोपाल बनला आहे. सोबतच भारतीने या गोपालाचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आणि लाखो चाहत्यांनी गोलूच्या फोटोंना आपली पसंती दर्शविली आहे.

कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं भारतीनं गोलूचा एक खास लुक (Haarsh Limbachiyaa) नेटकऱ्यांसाठी शेयर केला आहे. भारती आणि हर्षनं गोलूला बाळ गोपाळ केलं आहे. त्याची वेशभूषा ही कमालीची लक्षवेधी आहे. भारतीनं शेयर केलेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी देखील भारतीनं गोलुचे वेगवेगळे फोटो शेयर करुन चाहत्यांची पसंती मिळवली आहे. गोलु हा तीन महिन्यांचा आहे.

भारती आणि हर्ष हे टीव्ही मनोरंजन विश्वातील चर्चेतील सेलिब्रेटी आहेत. त्यामुळे लक्ष्यचे फोटो लगेचच व्हायरल झाले. फोटोतील गोलूचे चाहत्यांनी तोंडभरून कौतूक केले आहे. त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी त्याला नंदकुमार, नंदकिशोर, लाडानं लाडू असं म्हणूनही संबोधले आहे.

तो व्हिडिओ शेयर करताना भारतीनं देवाचे आभार मानले आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देताना तिनं लिहिलं आहे की, “मला प्रत्येक गोष्ट देण्यासाठी मी देवाची आभारी आहे. 🙏🏽❤️🧿🤗😍❤️😘 #krishnajanmashtami #love❤️ #golla @laksh_singhlimbachiya @haarshlimbachiyaa30 (sic).”

भारतीने पाठविलेल्या व्हिडिओला अनेक सेलिब्रेटींकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोणी लड्डूला छोटा कान्हा म्हणत आहे. कोणी लाल रंगाचे हृदयाचे इमोजी पाठवत आहेत.

माहितीसाठी सांगायचं म्हणजे भारती आणि हर्षला याच वर्षी ३ एप्रिलला लक्ष्य झाला. लक्ष्यचा परिचय करून देण्यासाठीही उभयतांनी यु ट्युब चॅनलवर या आधी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यालाही चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.