भारती सिंहला अडीच महिन्यापर्यंत कळलेच नाही की त...

भारती सिंहला अडीच महिन्यापर्यंत कळलेच नाही की ती गरोदर आहे, तिने सांगितला मजेशीर किस्सा (Bharti Singh Did Not Know That She Was Pregnant For Two And A Half Months, The Comedian Told An Interesting Anecdote)

आपल्या विनोदबुद्धीने सगळ्यांना खळखळून हसायला लावणारी कॉमेडी क्वीन भारती सिंह लवकरच आई होणार आहे. विशेष म्हणजे ती आठ महिन्यांची गरोदर आहे तरीही जोमाने शूटिंगचं काम करत आहे. अलिकडेच भारतीने आपले मॅटर्निटी फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यात ती कमालीची सुंदर दिसत होती, आई होणार असल्याचं तेज तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. भारती आणि पती हर्ष दोघंही आता त्यांच्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असलेले दिसत आहेत.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

काही महिन्यांपूर्वी भारतीने हर्षसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही गूड न्यूज दिली होती. ही गोड बातमी शेअर करताना ती अतिशय आनंदी होती. अलिकडेच एका मुलाखतीत भारतीने सांगितले की, अडीच महिन्यापर्यंत तिला ती गरोदर असल्याचे माहीत नव्हते. कदाचित तिच्या लठ्ठपणामुळे तिच्या लक्षात आले नसावे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

मुलाखती दरम्यान भारतीने सांगितले की, “मी गरोदर होती, पण अडीच महिन्यापर्यंत मला समजले नाही. स्थूल व्यक्तींचे लक्षात येत नसेल. मी खात होती, इकडे तिकडे फिरत होती. डान्स दिवानेच्या मंचावर नाचत होती. त्यानंतर एकदा तपासून बघूया असं वाटलं म्हणून मी टेस्ट केली, तेव्हाही टेस्ट केलेले किट तेथेच ठेवून बाहेर आली. पु्न्हा जाऊन पाहिले तर रिझल्ट पॉझिटीव्ह होता. मी हर्षला सांगितले, आम्हा दोघांसाठी हे सरप्राइज होतं. आम्ही बाळासाठी कोणताही प्लॅन केलेला नव्हता.”

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

दोघंही या वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये सहलीसाठी जाण्याचा प्लान करत आहेत. हर्ष आणि भारती यांची पहिली भेट कॉमेडी सर्कसमध्ये झाली होती, ही भेटही गमतीशीर होती. हर्षने भारतीसोबत झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना म्हटलं की, “मी कॉमेडी सर्कससाठी स्क्रिप्ट सांगत होतो आणि त्या वेळी ती खोलीत आली. तेव्हा लेखक म्हणून मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. सुरुवातीला माणूस तणावग्रस्त असतो. पण भारती अचानक खोलीत शिरली आणि तिने सगळ्यांना हसवलं. मी जे लिहिलं त्यापेक्षा भारतीनं ज्या पद्धतीने ते सादर केलं त्यामुळे लोकांना हसू आलं होतं. माझा बांध सुटला. तिची पहिली छाप ही अशी होती. मला खात्री आहे की त्यावेळी भारतीने माझ्याकडे लक्ष दिले नसेल. सांगायचं म्हणजे इंडस्ट्रीतील परफेक्ट जोडींपैकी एक जोडी हर्ष आणि भारती यांची आहे. यांनी ३ डिसेंबर २०१७ ला लग्न केलं होतं.