अनुप जलोटा यांच्या हस्ते अंमली पदार्थ प्रतिबंधक...

अनुप जलोटा यांच्या हस्ते अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे वादगस्त अधिकारी समीर वानखेडे यांना ‘भारत की शान’ ॲवॉर्ड प्रदान (‘Bharat Ki Shaan’ Award Conferred To IRS Officer Samir Wankhede At The Hands Of Anup Jalota)

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करणारे वादग्रस्त महसूल अधिकारी, आयआरएस समीर वानखेडे यांना काल स्वातंत्र्य दिनी ‘भारत की शान’ हे ॲवॉर्ड प्रदान करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक- संगीतकार अनुप जलोटा यांनी हे पारितोषिक मुंबईत वांद्रे येथील टायटल वेव्हज्‌ बुक स्टोअर येथे दिले. ‘लिट ओ फेस्ट’ या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेने हा सोहळा आयोजित केला होता.

” ‘लिट ओ फेस्ट’ संस्थेतर्फे मिळालेल्या या पारितोषिकाने माझा ऊर आनंदाने भरून आला आहे. अनुप जलोटाजी यांच्या हस्ते हे ॲवॉर्ड मिळाल्याने मला विशेष वाटते आहे. नार्को- दहशतवादाविरुद्ध माझा लढा, सदैव सुरू राहील. मला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या तरी मी कर्तव्यापासून हटणार नाही,” अशा भावना समीर वानखेडे यांनी व्यक्त केल्या.

सदर संस्थेच्या संस्थापक स्मिता पारीख यांनी समीर वानखेडे यांच्यासारख्या धैर्यवान व प्रामाणिक अधिकाऱ्यांचा गौरव करण्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

या सोहळ्याला बरेच कवी, समाजसेवक, उद्योगपती मंजू लोढा, अनिल मुरारका तसेच वानखेडे यांच्या पत्नी – अभिनेत्री क्रांती रेडकर उपस्थित होते.