शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता समाविष्ट करा ̵...

शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता समाविष्ट करा – मौनी रायचं मत (‘Bhagvad Gita Should Be A Part Of School Syllabus’ – Says Actress Mouni Roy)

अभिनेत्री मौनी रॉय आपल्या ग्लॅमरस्‌ दिसण्याने चर्चेत असते. सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांनी ती चांगलीच चर्चेत आहे. याशिवाय ती अधिकतर चर्चेत आली आहे, ती वेगळा मुद्दा घेऊन. शालेय अभ्यासक्रमात भगवद्‌गीतेचा समावेश करा, असं मत तिनं व्यक्त केलं आहे.

गीता हा निव्वळ धार्मिक ग्रंथ नसून त्या पलीकडे खूप काही आहे. आपल्या जीवनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यामधून आपल्याला मिळतात. शालेय शिक्षण व एकूणच शिक्षणपद्धतीची पातळी वाढविली पाहिजे. त्यामध्ये गीतेचा समावेश केला तर ही पातळी वाढेल.

मी लहानपणी गीतेचा सारांश वाचला होता. पण तेव्हा मला त्याचा अर्थ लागला नव्हता, असं मौनी सांगते. लॉकडाऊनच्या आधी मी गीता शिक्षणाच्या क्लासला जाऊ लागले. पण कामात व्यस्त झाल्याने तो मी पूर्णपणे अटेंड करू शकले नाही. पण लॉकडाऊनच्या काळात मला ही संधी मिळाली. मी पूर्णपणे धार्मिक बनले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, गीता आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. जीवनाचं पूर्ण सार तिच्यात सामावलं आहे. वेद आणि उपनिषदांचा जन्म आपल्या देशात झाला आहे, पण आपण त्याबद्दल अनभिज्ञ आहोत.

शाळेपासून बॉलिवूडपर्यंत गीतेची गरज आहे. सामान्य परिवाराला देखील गरज आहे. कारण ती तुमची विचारशक्ती बदलून तुम्हाला रुढीवादी बनू देत नाही. ज्या तणावाच्या स्थितीत आपण काम करतो, त्याला दिलासा देणारा खजिना यात भरला आहे. पण आपण तो जाणून घेऊ इच्छित नाही किंवा शोधूही शकत नाही. आपण त्याबाबत अज्ञानी आहोत.

छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम
म्हणूनच भगवद्‌गीतेचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केला पाहिजे. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत. तुमच्या मनात कोणताही प्रश्न निर्माण झाला तर त्याचं एकच उत्तर आहे, भगवद्‌गीता.

चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा