सावधान : लठ्ठपणा इतर २२५ आजारांना घेऊन येतोR...

सावधान : लठ्ठपणा इतर २२५ आजारांना घेऊन येतो… तो कमी कसा करावा? (Beware, Obesity Causes 225 Direct And Indirect Diseases : How To Control It)

वाढलेले वजन आणि लठ्ठपणा या आरोग्याच्या मोठ्या समस्या आहेत. कारण लठ्ठपणा हा एकच आजार नसून इतर २२५ आजारांना घेऊन येतो. ज्यांचा संबंध प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे असतो. ही भयावह स्थिती मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे कन्सल्टंट बॅरिएट्रीक सर्जन डॉ. रमण गोयल यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले होते की, सर्व वयोगटातील व्यक्तींचे वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यासंबंधात त्यांनी जी आकडेवारी घोषित केली होती, ती पाहता लठ्ठपणा ही जागतिक महामारी म्हणून उदयास येत आहे; अशी शंका येते. आपल्या भारतात तर ज्यादा वजन आणि लठ्ठपणाचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा वेगाने वाढत आहेत.

अशी भयावह स्थिती असली तरी त्यावर उपचार आहेत, असे डॉ. रमण गोयल सांगतात, “मानवजातीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्‌भवण्याची शक्यता आहे की, पुढची पिढी त्यांच्या पालकांपेक्षा कमी आयुष्य जगेल. या लठ्ठपणावर मात करण्याचे नैसर्गिक उपचार म्हणजे कॅलरीज्‌ नसलेला आहार घेणे व नियमितपणे व्यायाम करणे. यातून परिणाम दिसून आले नाही तर बॅरिएट्रीक करणे, हा त्यावर चांगला उपचार आहे. ही शस्त्रक्रिया सुरक्षित असून तिच्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी धोका ३० टक्के कमी होतो आणि स्तन एंडोमेट्रीयल कर्करोगात लक्षणीय घट दिसून येते,” असे डॉक्टरांनी सांगितले आहे.