काजळ लावा नीट (Benefits Of Kajal)

काजळ लावा नीट (Benefits Of Kajal)

डोळ्यांना आपण जुलमी म्हणतो कारण त्यांचं सौंदर्य हे घायाळ करणारं असतं. त्या सौंदर्यामध्ये हरवून जायला होतं. आता डोळ्यांच्या सौंदर्यासाठी अनेक सौंदर्यप्रसाधनं वापरली जात असली तरी पूर्वी डोळ्यांत काजळ लावण्याचीच पद्धत होती आणि आत्ताही काजळ लावतात. परंतु आता काजळ अधिक ठळकपणे दिसावं यासाठी जाडसर ठेवतात. त्यामुळे सकाळी काजळानं रेखीव दिसणारे डोळे संध्याकाळी डोळ्याबाहेर पसरलेल्या काजळामुळे काळेकाळे दिसतात. आणि हे पसरलेलं काजळ मेकअपप्रमाणेच अलगद काढावं लागतं. काजळ काढण्याच्या काही सोप्या पद्धती.
सर्व प्रथम कॉटन बड, मेकअप रिमुव्हरमध्ये बुडवा आणि मग हळूहळू काजळ काढा. नंतर माइल्ड फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा.
घरी मेकअप रिमुव्हर नसेल तर ऑलिव्ह तेलामध्ये कापूस बुडवून त्याने काजळ काढा.
कॉटन बड नसल्यास टिश्यू पेपर दुमडून तो मेकअप रिमुव्हर किंवा ऑलिव्ह
तेलामध्ये बुडवून त्याने काजळ काढा.
वेळ कमी आहे आणि लगेच काजळ काढायचं आहे तर एक स्वच्छ कॉटनचं कापड घेऊन पाण्याने भिजवा आणि त्याने काजळ पुसून काढा. त्यानंतर फेसवॉशने चेहरा धुवा.
गुलाबपाण्यामध्ये कापूस बुडवून त्याने काजळ काढता येतं.
पेट्रोलियम जेलीचा वापर करूनही काजळ काढता येतं. त्यासाठी बोटांच्या टोकावर थोडी जेली घेऊन त्याने डोळ्यांच्या आजूबाजूला मसाज करा. त्यानंतर कॉटनच्या कापडाने वा टिश्यूने काजळ स्वच्छ करा.

स्मार्ट टिप्स
काजळ लावल्या लावल्या डोळे चोळू नयेत. त्यामुळे काजळ पसरते.
काजळ घेतेवेळी ते चांगल्या कंपनीचंच असावं.
काजळ लावल्यानंतर जर डोळे चुरचुरत असतील वा डोळ्यांतून पाणी येत असेल तर ते काजळ लावू नये.
डोळ्यांत खाज येत असेल तर टिश्यू पेपरने हळूहळू डोळे चोळा.
एवढं सगळं करूनही काजळ लावणं जर त्रासदायक वाटत असेल तर सरळ काजळाऐवजी आयलायनरचा वापर करावा. परंतु आयलायनरही चांगल्या कंपनीचा असावा.

डोळ्यांत काजळ आणि ओठांना लिपस्टिक हा झाला रुटीन मेकअप. काजळ लावल्यानं डोळे खूप छान दिसतात. हल्ली काजळ पेन्सिल तसेच लिपस्टिक प्रमाणे काजळ मिळतं आणि ते जाडसर लावलं जातं. त्यामुळे काही वेळानं ते पसरतं. ते अलगद काढावं लागतं. कसं, त्यासाठी वाचा –